सात जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:08 AM2021-07-17T04:08:21+5:302021-07-17T04:08:21+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : कामठी (जुनी) पाेलिसांनी शहरातील कमसरी बाजार-भाजीमंडी मार्गावर केलेल्या कारवाईमध्ये कत्तलखान्यात नेत असलेल्या सात जनावरांची ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : कामठी (जुनी) पाेलिसांनी शहरातील कमसरी बाजार-भाजीमंडी मार्गावर केलेल्या कारवाईमध्ये कत्तलखान्यात नेत असलेल्या सात जनावरांची सुटका केली. त्या जनावरांची एकूण किंमत ७० हजार रुपये आहे. आराेपी पळून गेल्याने पाेलीस त्याचा शाेध घेत आहेत. ही कारवाई गुरुवारी (दि. १५) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
कामठी (जुनी) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना कामठी शहरातील भाजीमंडी-कमसरी बाजार मार्गावरून सात जनावरे एकमेकांना बांधली असल्याचे आढळून आले. मात्र, पाेलीस येत असल्याचे लक्षात येताच जनावरांसाेबत असलेल्या व्यक्तीने जनावरे साेउून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
ती जनावरे कत्तलखान्यात नेत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेताच पाेलिसांनी त्यांची सुटका केली आणि त्यांनी नजीकच्या गाेरक्षणमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली. या जनावरांची किंमत ७० हजार रुपये असल्याची माहिती ठाणेदार राहुल शिरे यांनी दिली. आराेपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई तंगराज पिल्ले, गयाप्रसाद वर्मा, अश्विन चहांदे यांच्या पथकाने केली.