सुधा मूर्ती यांच्या ‘हाऊ दी अर्थ गॉट इट्स ब्युटी’चे विमोचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:11 AM2021-09-15T04:11:09+5:302021-09-15T04:11:09+5:30
- प्रभा खेतान फाऊंडेशनच्या ‘मुस्कान’ने घेतला पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : साहित्य व संस्कृतीच्या माध्यमातून विविधतेतील विभिन्न पैलूंवर ...
- प्रभा खेतान फाऊंडेशनच्या ‘मुस्कान’ने घेतला पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साहित्य व संस्कृतीच्या माध्यमातून विविधतेतील विभिन्न पैलूंवर प्रभा खेतान फाऊंडेशन समाजाचे लक्ष केंद्रित करत असते. फाऊंडेशनचा नवा उपक्रम ‘मुस्कान’ युवक व मुलांमध्ये वारसा, साहित्य व संस्कृतीला लोकप्रिय बनविण्याच्या हेतूने कार्य करते.
याच उद्दिष्टांच्या अनुषंगाने ‘मुस्कान’च्या नव्या सत्रात प्रख्यात लेखिका, उद्योजक व वक्ता सुधा मूर्ती यांची पुस्तक ‘हाऊ दी अर्थ गॉट इट्स ब्युटी’चे विमोचन करण्यात आले. यावेळी श्रुतकीर्ती खुराणा प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी कार्यक्रमाच्या संवादकाची भूमिका पार पाडली. फाऊंडेशनच्या ओवरसिज प्रकरणातील मानद संयोजिका आकृती पेरीवाल यांनी पाहुण्यांचा परिचय करवून दिला. प्रारंभी श्रुतकीर्ती खुराणा यांनी ‘हाऊ दी अर्थ गॉट इट्स ब्युटी’ या पुस्तकाबाबत माहिती दिली. सुधा मूर्ती यांचे हे ३९ वी पुस्तक असून हे २३० वे शीर्षक आहे. या पुस्तकाचे अन्य भाषांमध्येही अनुवाद झालेले आहेत. सुधा मूर्ती यांचे हे पुस्तक वसुंधरेच्या सौंदर्यावर केंद्रित आहे. पृथ्वीवरील अनेक पक्षी, प्राणी, कीटक यांचे घर आहे. तरीही ते आपल्या अधिवासापासून वंचित झालेले आहे. यावेळी बोलताना मूर्ती यांनी आपल्या आईच्या शिकवणीचा भाव व्यक्त केला. लहानपणी त्यांच्या आईने झाडावरील सर्वच फळे न तोडता काही फळे पक्षी व प्राण्यांसाठी झाडालाच राहू द्या, ही शिकवण दिली. कार्यक्रमात सहभागी देशभरातील मुलांनी यावेळी सुधा मूर्ती यांना अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. या कार्यक्रमाची प्रस्तूती श्री सिमेंट लिमिटेडची होती.
.............