रिलायन्स जिओ इंटरनेट कंपनी व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:10 AM2021-02-26T04:10:17+5:302021-02-26T04:10:17+5:30
नागपूर : नागपूर शहरात सर्वत्र रिलायन्स जिओ इंटरनेट कंपनीने रस्ते आणि फूटपाथ तोडून अंडरग्राऊंड इंटरनेट केबल तर बहुतांश ठिकाणी ...
नागपूर : नागपूर शहरात सर्वत्र रिलायन्स जिओ इंटरनेट कंपनीने रस्ते आणि फूटपाथ तोडून अंडरग्राऊंड इंटरनेट केबल तर बहुतांश ठिकाणी नवीन डांबरी रोड आणि फूटपाथ तोडून लाईन टाकली आहे. याकरिता मनपाने कंपनीला परवानगी दिली होती, पण कंपनीने दुरुपयोग करून सार्वजनिक रस्ते व फूटपाथ खोदले आहेत. आता मनपाच्या जनतेच्या पैशातून फूटपाथ व रस्ते पूर्ववत करण्याचे काम करीत आहेत. ही सर्व कामे मनपाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय शक्य नाही. यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन काँग्रेस कमिटीच्या राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे राष्ट्रीय संयोजक अॅड. अक्षय समर्थ यांच्या नेतृत्वातील प्रतिनिधी मंडळाने महापौर दयाशंकर तिवारी, अतिरिक्त मनपा आयुक्त राम जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांना दिले आहे. निवेदन देताना शत्रुघ्न महतो, आयुष हिरावर, नरेश नायडू, रामप्रसाद चौधरी, सोहन कोकोड, मूलचंद बैसवारे, हरीश चिडाम, अविनाश राऊत, धीरज उईके, शुभम खवशी उपस्थित होते.