जात वैधता प्रमाणपत्रापासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 07:31 PM2018-07-05T19:31:36+5:302018-07-05T19:33:15+5:30

इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने त्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. यास्तव या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र विनाअनुदानित व्यावसायिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम २०१५ याद्वारे स्थापन केलेल्या प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या कक्षेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, याबाबतचे निवेदन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी दोन्ही सभागृहात सादर केले.

Relief to Backward class students from caste validity certificate | जात वैधता प्रमाणपत्रापासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा

जात वैधता प्रमाणपत्रापासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा

Next
ठळक मुद्देउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे दोन्ही सभागृहात निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने त्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. यास्तव या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र विनाअनुदानित व्यावसायिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम २०१५ याद्वारे स्थापन केलेल्या प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या कक्षेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, याबाबतचे निवेदन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी दोन्ही सभागृहात सादर केले.
त्याप्रमाणे ५ जुलै रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे. या पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणार आहे. तसेच, विविध व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमांकरिता विद्यार्थ्यांना आतापर्यंत मिळत असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनांचे लाभ कायम राहतील, याकरितादेखील स्वतंत्ररीत्या आदेश निर्गमित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Relief to Backward class students from caste validity certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.