दिलासा कायम, जिल्ह्यात केवळ एकच नवा कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:11 AM2021-08-24T04:11:09+5:302021-08-24T04:11:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सलग अकराव्या दिवशी नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. सोमवारच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ...

Relief remains, only one new corona in the district | दिलासा कायम, जिल्ह्यात केवळ एकच नवा कोरोनाबाधित

दिलासा कायम, जिल्ह्यात केवळ एकच नवा कोरोनाबाधित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सलग अकराव्या दिवशी नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. सोमवारच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात केवळ एकच नवा बाधित आढळला व ग्रामीणमध्ये परत शून्य रुग्णसंख्येची नोंद झाली. बाधितांचा दर ०.०६ इतका आहे.

सोमवारच्या आकडेवारीनुसार सोमवारी दहा रुग्ण बरे झाले. त्यातील नऊ शहरातील होते. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ६७ शहरातील, तर ६ ग्रामीण भागातील आहेत. सक्रिय रुग्णातील ३१ जण विविध रुग्णालयात उपचार घेत असून, ४२ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

सोमवारच्या अहवालानुसार, जिल्ह्यात चाचण्यांची संख्या घटली व २४ तासात केवळ १ हजार ७५९ चाचण्या झाल्या. त्यातील १ हजार ५४२ शहरात तर २१७ ग्रामीण भागातील होत्या. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४ लाख ९२ हजार ९८९ वर पोहोचला आहे. यात शहरातील ३ लाख ४० हजार ४९, तर ग्रामीणमधील १ लाख ४६ हजार १२४ जणांचा समावेश आहे. तसेच एकूण मृत्यूसंख्या १० हजार ११८ वर स्थिर आहे.

- कोरोनाची सोमवारची स्थिती...

दैनिक चाचण्या : १,७५९

शहर : १ रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : ० रुग्ण व ० मृत्यू

एकूण बाधित रुग्ण :४,९२,९८९

- सक्रिय रुग्ण : ७३

- बरे झालेले रुग्ण : ४,८२,७९८

- मृत्यू : १०,११८

Web Title: Relief remains, only one new corona in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.