३० वर्षाच्या गुडघेदुखीपासून मिळाली मुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:06 AM2020-12-09T04:06:58+5:302020-12-09T04:06:58+5:30
भरतनगर, नागपूर येथील निवासी शोभा रतन काबरा गेल्या २५ - ३० वर्षापासून गुडघेदुखीपासून त्रस्त होत्या. दुसऱ्या प्रसुती पासूनच त्यांना ...
भरतनगर, नागपूर येथील निवासी शोभा रतन काबरा गेल्या २५ - ३० वर्षापासून गुडघेदुखीपासून त्रस्त होत्या. दुसऱ्या प्रसुती पासूनच त्यांना गुडघेदुखीची समस्या सुरू झाली होती. १० वर्षापूर्वी तर त्यांना चालताही येत नव्हते. पाय तिरपे झाले होते. पूर्ण शरीर कठोर झाले होते. याच दरम्यान त्यांना वाताच्या समस्येनेही ग्रासले. त्वचा काळवंडायला लागली होती. अन्न ग्रहणही कठीण झाले होते. गुडघे बदलण्याचा सल्लाही देण्यात आला होता.
बरीच वर्षे वेगवेगळ्या डॉक्टरांकडे होमियोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार झाले. मात्र, गुण येत नव्हते. सगळीकडून हताश झाल्यानंतर त्या डॉ. नितेश खोंडे यांच्याकडे गेल्या. तेथे त्यांना योग्य उपचार मिळाले आणि गुण मिळायला लागले. त्यामुळे, त्या आता सहज चालू शकत आहेत. तब्बल २५-३० वर्षानंतर आता स्कूटरवर बसणे शक्य होत असल्याचे शोभा काबरा यांनी सांगितले. सलग सहा महिनेपर्यंत उपचार घेतल्यानंतर त्यांची समस्या कमी झाली. सोबतच डोकेदुखी, श्वसनासंदर्भातील अडचण, छातीतील अकडन, डोक्यातील अकडन आदीपासून मुक्ती केली आहे.
डॉ. नितेश खोंडे यांनी शोभा काबरा यांच्यावर केलेल्या उपचारांबाबत स्पष्टीकरण दिले. ईलापिडी, पोडीकिडी, पीडिचिल, नवराकिडी, शिरोधारा, जानोधारा, उपनाह अवगाह, संकर स्वे चिकित्सा, लेपनम, शिला करपोराधी, गौरीकाधी, लता हिंगवाधि, परीऑस्ट, परीकैल्प, इंसोकैल्प आदींचा समावेश उपचारात केला. सुरुवातीच्या सहा महिन्यात त्यांच्या गुडघेदुखीतील ९० टक्के समस्या कमी झाल्या. आता तीन वर्षाच्या उपचारानंतर त्या पूर्णत: समस्यामुक्त झाल्याचे खोंडे म्हणाले.
* करावा लागला नातेवाईकांच्या विरोधाचा सामना
शोभा काबरा यांना आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यास स्वत:च्याच नातेवाईकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. पती व मुलाकडूनच आयुर्वेदिक उपचार पद्धतीवर वारंवार शंका उपस्थित केल्या जात होत्या. या उपचाराने काहीच शक्य होणार नाही, असे वारंवार बोलले जात होते. परंतु, शोभा काबरा यांना आयुर्वेदानेच लाभ मिळेल यावर विश्वास होता आणि अखेर तो विश्वास खरा ठरला. आयुर्वेदिक उपचारावर त्या ठाम राहिल्या आणि आज त्यांच्या समस्या पूर्णत: समाप्त झाल्या आहेत.
* प्रारंभिक अवस्थेतच आयुर्वेदाचे उपचार घेतल्यास ज्यादा लाभ
सामान्यत: रुग्ण सगळीकडे फिरून आल्यावर आयुर्वेदाकडे वळतात. मात्र, तोवर बराच उशीर झालेला असतो. असे असतानाही रुग्णाला तात्काळ लाभ मिळण्याची अपेक्षा असते. आजाराच्या प्रारंभिक अवस्थेतच आयुर्वेदिक उपचार घेण्यास सुरुवात केली तर लाभ लवकर मिळतो. उशिराने येण्यामुळे आजारही वाढलेला असतो. त्यामुळेच, आजारापासून मुक्ती मिळण्यासही वेळ लागतो. त्याच कारणाने आयुर्वेदिक उपचारात वेळ देणे गरजेचे असते.
.......