धर्म नेहमीच न्यायसंगत नसतो - सुरेश द्वादशीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:05 AM2019-12-24T00:05:00+5:302019-12-24T00:06:02+5:30
मूल्य निष्ठा त्यागाच्या दिशेने जाणाऱ्या असतात तर धर्मनिष्ठा समूह आणि जातीच्या दिशेने जाणाऱ्या असतात. मात्र न्याय निष्ठा त्यागाच्या दिशेने जाणाऱ्या असतात. असे असले तरी धर्म हा नेहमीच न्यायाची भूमिका घेत नसतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मूल्य निष्ठा त्यागाच्या दिशेने जाणाऱ्या असतात तर धर्मनिष्ठा समूह आणि जातीच्या दिशेने जाणाऱ्या असतात. मात्र न्याय निष्ठा त्यागाच्या दिशेने जाणाऱ्या असतात. असे असले तरी धर्म हा नेहमीच न्यायाची भूमिका घेत नसतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्या वतीने युगांतर व्याख्यानमाला अंतर्गत प्रा. द्वादशीवार यांचे ‘न्याय’ या विषयावर तिसरे प्रवचनपुष्प मंगळवारी पार पडले. त्याप्रसंगी त्यांनी साक्रेटिस आणि प्लेटो यांच्या न्यायासंदर्भातील संकल्पाना सांगितल्या. फॅसिमॉकस हा विचारवंत सत्ताधारी सांगतील तोच न्याय, असे म्हणतो. त्याच्या बाजूने बोलणारे न्यायी, विरोधात बोलणारे देशद्रोही ठरतात. कॅसिकल्स तत्वज्ञही हेच सांगतो. प्लेटोच्या राज्यकर्ता होण्याच्या संकल्पना वेगळ्या आहेत. त्यानुसार धर्म नेहमीच न्यायाची भूमिका घेत नाही. साक्रेटिकसच्या न्याय संकल्पना गुणवत्ता असेल तरच टिकेल, असे सांगते. त्यामुळे गुणवता ही सन्मानाचा विषय झाली पाहिजे.
ते म्हणाले, घटना जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तयार झाली आहे. न्यायाचा विचार करताना व्यक्ती सर्व श्रेष्ठ आहे. जगात १४ हजार युद्ध झालीत, त्यामध्ये लाखो माणसे मारल्या गेली. १६ कोटी ९० लाख वैचारिक दुराग्रहापोटी मारली गेलीत. इच्छा व वासना संपल्यावर युद्ध करण्यास आपले तत्वज्ञान सांगते. खरे तर त्यानंतर युद्धाची इच्छाच राहात नाही. म्हणूनच कुरूक्षेत्रावर सांगितलेली भगवत्गीता हा युद्ध सांगणारा ग्रंथ नसून अहिंसा सांगणारा ग्रंथ ठरतो.
न्याय ही माणसाला मिळालेली संजीवनी आहे. याचं संजीवनीच्या आधारावर माणूस जगत असतो. आपण ज्या विचारांनी जगतो, त्याची चिकित्सा कधी करत नाही. माणूस म्हणून एकारलेपणाचा विचार करणे हाच न्यायाचा खरा मार्ग आहे.
न्याय व्यवस्थेत समतोल साधला पाहिजे. नागरिकांना घटनादत्त अधिकार आहेत. ते निर्माण करणारी व्यवस्था राज्यांनी निर्माण करायला हवी. कोणताही धर्म स्त्रियांना न्याय देत नाही, ईश्वर सुद्धा नाही. आपली गुणवत्ता निर्माण करणे, गुणवत्ता मानणे हा न्याय आहे. न्याय व्यवस्थेत समतोल साधला पाहिजे. घटनेने नागरिकांना अधिकार दिले आहेत. ते निर्माण करण्याची व्यवस्था राज्यांनी निर्माण करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या व्याख्यानाला माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, साहित्यिक महेश एलकुंचवार, गिरीष गांधी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.