चापेगडी शिवारातील अतिक्रमण काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:08 AM2021-01-15T04:08:52+5:302021-01-15T04:08:52+5:30
कुही : वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून जागा बळकावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करीत वन अधिकाऱ्यांनी जमिनीचा ताबा घेतला. ही कारवाई बुधवारी चापेगडी ...
कुही : वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून जागा बळकावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करीत वन अधिकाऱ्यांनी जमिनीचा ताबा घेतला. ही कारवाई बुधवारी चापेगडी शिवारात करण्यात आली.
चापेगडी नियतक्षेत्र साळवा शिवारात वन विभागाची जमीन असून, तेथे गावकऱ्यांनी तीन झाेपड्या बांधून अनधिकृतरीत्या ताबा घेतला हाेता. दरम्यान वनरक्षक जी. एस. सहारे यांच्या तक्रारीवरून क्षेत्र सहायक राजू सुधेकर यांनी माेक्यावर पाहणी केली. विलास पुंडलिक वैद्य, शिवा गाेपीचंद कंगाली दाेन्ही रा. चापेगडी आणि महादेव लक्ष्मण गायधने रा. खरबी यांनी कक्ष क्र. ४४३, संरक्षित वन सर्व्हे क्र. १६२ मध्ये झाेपड्या तयार करून वन जमिनीवर अतिक्रमण केल्याचे आढळले. ते अतिक्रमण काढून घेत वन अधिकाऱ्यांनी जमीन ताब्यात घेतली. ही कारवाई उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. के. मडावी यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक आर. डी. सुधेकर, वनरक्षक जी. एस. सहारे, पी. दहीकर, डी. सी. भानारकर, पी. एस. गराडे, एस. डी. येंडे, ए. डी. साेनवणे, टी. एल. उके, ए. ए. मेश्राम, वनमजूर वासुदेव ठाकरे यांच्या पथकाने केली.