झिरो बॅलन्स अकाऊंट तात्काळ काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 01:45 AM2017-08-25T01:45:02+5:302017-08-25T01:45:43+5:30

ग्रामीण भागात सामाजिक अर्थसाहाय्य योजनेसाठी ‘झिरो बॅलन्स’ असलेले बँक खाते उघडण्यासाठी बँका टाळाटाळ करतात.

Remove Zero Balance Account immediately | झिरो बॅलन्स अकाऊंट तात्काळ काढा

झिरो बॅलन्स अकाऊंट तात्काळ काढा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी सचिन कुर्वे : योजनांचा लाभ न देणाºया बँकांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण भागात सामाजिक अर्थसाहाय्य योजनेसाठी ‘झिरो बॅलन्स’ असलेले बँक खाते उघडण्यासाठी बँका टाळाटाळ करतात. या घटनेची गंभीर दखल घेऊन ज्या बँका झिरो बॅलन्सवर खाते उघडणार नाही तसेच या खात्यामध्ये निश्चित राशी जमा करण्याबद्दल आग्रह करत असतील अशा बँका संदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन अशा बँकांना सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी लीड बँक व्यवस्थापकांना गुरुवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन सभागृहात जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी राष्ट्रीयकृत बँकांच्या जिल्हा समन्वय अधिकाºयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक शशीराज, अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक अयुब खान, रिझर्व्ह बँकेचे सहायक जनरल मॅनेजर राजशेखरम, नाबार्डच्या मैथिली कोवे आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बचत खाते उघडताना कुठल्याही रकमेची आवश्यकता नाही. ज्या बँका किमान बचत रक्कम घेत असतील अशा बँकांची तक्रार संबंधित बँकांच्या अधिकाºयांकडे करा. त्यांनी दखल न घेतल्यास थेट भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ग्राहक शिक्षण व प्रोटेक्शन सेलकडे तक्रार करावी, अशी माहिती यावेळी रिझर्व्ह बँकेचे सहायक महाव्यवस्थापक राजेश्वरम यांनी दिली. बँकेच्या व्यवहारासंदर्भात समाधानी नसल्यास प्रथम बँकेशी संपर्क करा.
त्यांच्याकडून समाधान न झाल्यास अशा तक्रारी रिझर्व्ह बँकेच्या सीईपीसी सेलकडे प्राप्त झाल्यास त्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या कवडससह इतर शाखांमध्ये महिला बचत गटांना कर्ज वाटप, शालेय विद्यार्थ्यांची झिरो बॅलन्सवर खाते उघडण्यास टाळाटाळ करण्यात आल्याबद्दल गंभीर दखल घेण्यात आली.
सामाजिक साहाय्यता योजनेंतर्गत मिळणाºया लाभाची रक्कम थेट बँकेत जमा होत असल्यामुळे या खात्यात किमान रक्कम असण्याची आवश्यकता नाही. तसेच शालेय विद्यार्थ्यांना मिळणाºया योजनेच्या लाभासाठी बचत खाते सर्व बँकांनी उघडावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

कर्जमाफी योजनेची माहिती सुलभपणे उपलब्ध करून द्या
शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांनी शेतकºयांना त्यांच्या कर्जासंदर्भात आवश्यक माहिती सुलभपणे उपलब्ध करून देताना प्रत्येक शाखेत कर्जमाफी संदर्भातील शेतकरी सभासदांच्या याद्या उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिल्या.
खरीप हंगामामध्ये ४६ हजार ८१६ शेतकºयांना ४८४ कोटी ४६ लक्ष रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले असले तरी शेतकºयांच्या मागणीनुसार कर्ज प्रकरणे सर्व बँकांनी मंजूर करावीत. शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज भरावयाचे असल्याने शेतकºयांना त्यांच्या कर्ज प्रकरणासंदर्भात माहिती उपलब्ध करुन द्यावीत. तसेच आॅन लाईन अर्ज भरताना या संदर्भात सहकार्य करावे, अशी सूचना यावेळी केली.

Web Title: Remove Zero Balance Account immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.