नवीन कामठी येथील भूखंडाच्या लीजचे नुतनीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:07 AM2021-07-22T04:07:43+5:302021-07-22T04:07:43+5:30
कामठी : कामठी नगर परिषदेच्यावतीने पाडलेल्या ले-आऊट वरील भूखंडाच्या लीज नूतनीकरण करण्याच्या मागणीसाठी सेवादल काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी आर. विमला ...
कामठी : कामठी नगर परिषदेच्यावतीने पाडलेल्या ले-आऊट वरील भूखंडाच्या लीज नूतनीकरण करण्याच्या मागणीसाठी सेवादल काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी आर. विमला यांना निवेदन देण्यात आले. कामठी नगर परिषदेच्यावतीने १९८८ मध्ये नवीन कामठी येथे शासकीय जमिनीवर १२०० भूखंड पाडून त्याची नागरिकांना विक्री केली होती. त्या भूखंडाची लीज ३१ मार्च २०१८ ला संपली आहे. या भूखंडावर भूखंडधारकाकडून बांधकाम केले जात आहे. यासाठी काहींनी भूखंड गहाण ठेवण्याची तयारी दर्शवित बँकेकडे कर्जाची मागणी केली असता भूखंडाची लीज संपली असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांना कर्ज नाकारले आहे. नागरिकांची ही समस्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांना नगर परिषदेच्या ले-आऊट वरील भूखंडाची लीज नूतनीकरण करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात कामठी यंग बिग्रेड सेवादल काँग्रेस अध्यक्ष आकाश भोकरे, राजाभाऊ ढोके, सुगत रामटेके, मकबूल हैदरी, विठ्ठल नन्हारे, रेवा बागाईतकर, बंडू लांडगे, सीताराम राऊत, नीलकंठ भोयरकर, नामदेव सावरकर, अजय ढोके, जगदीश बावनकुळे, अरविंद फुले,नरेश महल्ले आदींचा समावेश होता.