अपघात-स्थळे त्वरित दुरुस्त करा : गडकरी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:12 AM2021-09-05T04:12:07+5:302021-09-05T04:12:07+5:30
नागपूर : शहर व जिल्ह्यातील अपघात स्थळांचा शोध घेऊन ते त्वरित दुरुस्त करा. अपघातांवर नियंत्रण यावे यासाठी प्रशासनातील वरिष्ठ ...
नागपूर : शहर व जिल्ह्यातील अपघात स्थळांचा शोध घेऊन ते त्वरित दुरुस्त करा. अपघातांवर नियंत्रण यावे यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र बसून अपघात स्थळांची माहिती एकत्र करावी व अपघात स्थळे त्वरित दुरुस्त करण्यात यावीत असे निर्देश केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी वाहतूक प्रशासन, मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय व वाहतूक पोलीस विभागाला दिले.
‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’तर्फे नागपूर रस्ते सुरक्षा प्रकल्पाचे गडकरी यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी खा. विकास महात्मे, आ. समीर मेघे, आ. प्रवीण दटके, आ. नागो गाणार, आ. टेकचंद सावरकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी विमला आर., मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन, वाहतूक विभागाचे अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य चंद्रशेखर मोहिते उपस्थित होते.