कळमेश्वर शहरातील हॅण्डपंप दुरुस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:08 AM2021-05-16T04:08:27+5:302021-05-16T04:08:27+5:30
कळमेश्वर : कळमेश्वर-ब्राह्मणी शहरात पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली असून, एक-दाेन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात काही हॅण्डपंप असून, ...
कळमेश्वर : कळमेश्वर-ब्राह्मणी शहरात पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली असून, एक-दाेन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात काही हॅण्डपंप असून, ते कित्येक दिवसांपासून नादुरुस्त आहेत. त्या हॅण्डपंपची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली असून, त्या हॅण्डपंपचे पाणी पिण्याऐवजी इतर कामांसाठी वापरता येऊ शकते, असेही नागरिकांनी सांगितले.
शहर व परिसरातील बहुतांश जलस्त्राेत दूषित आहेत. त्यामुळे शहराला पेंच इटनगाेटी जलाशयातून पाणीपुरवठा केला जाताे. सध्या शहरात एक-दाेन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून, टंचाईमुळे पाणीकपात केली जात आहे. शहरात सध्या ३० हॅण्डपंप आहेत. नागरिक यातील सहा हॅण्डपंपचे पाणी वापरतात. शहरातील बहुतांश हॅण्डपंपला पाणी असून, ते नादुरुस्त असल्याने त्यातील पाणी वापरणे शक्य हाेत नाही. या हॅण्डपंपची वेळीच दुरुस्ती केल्यास पाणीटंचाईची तीव्रता कमी हाेऊ शकते, असेही नागरिकांनी सांगितले. हॅण्डपंपची दुरुस्ती करण्याबाबत आपण नगर पालिकच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्याला विनंती केली हाेती, अशी माहिती गंगाधर नागपुरे, अरुण वाहणे यांनी दिली. परंतु, १५ दिवसांपासून प्रशासनाने एकही हॅण्डपंप दुरुस्त केला नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे शहरातील हॅण्डपंपची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी गंगाधर नागपुरे, अरुण वाहणे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.