चतुर्थ श्रेणीचा शासन निर्णय रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:25 AM2020-12-15T04:25:34+5:302020-12-15T04:25:34+5:30

नागपूर : शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पद व्यपगत करून मानधनावर चतुर्थ श्रेणी कर्मचारी नेमण्यात यावा, यासंदर्भातील शासन निर्णय ११ ...

Repeal the fourth class ruling | चतुर्थ श्रेणीचा शासन निर्णय रद्द करा

चतुर्थ श्रेणीचा शासन निर्णय रद्द करा

Next

नागपूर : शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पद व्यपगत करून मानधनावर चतुर्थ श्रेणी कर्मचारी नेमण्यात यावा, यासंदर्भातील शासन निर्णय ११ डिसेंबर रोजी शासनाने काढला. हा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य खासगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावलीच्या तरतुदीशी विसंगत आहे. शिक्षकेतर कर्मचारी शाळेचा अविभाज्य घटक आहे. त्यांची मानधनावर नियुक्ती करून शिक्षण विभागाने त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली. संघटनेचे विभागीय अध्यक्ष खेमराज कोंडे यांच्या नेतृत्वात शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे शासन निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी देवेंद्र सोनटक्के, ओमप्रकाश धाबेकर, सतीश अवतारे, लीलाधर निखाडे, आनंद महल्ले, राजेश तिडके, नीलेश ढोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Repeal the fourth class ruling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.