ऑनलाईन शिक्षण घेताना मुलांना पुन्हा पुन्हा हे सांगा.. करायला लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 12:28 PM2020-07-07T12:28:25+5:302020-07-07T17:15:29+5:30

शाळा ऑनलाईन असो अथवा ऑफलाईन असो या कोरोना विषाणूजन्य परिस्थितीत सर्वांना खबरदारी घेणे फार आवश्यक आहे सर्वांची जीवनशैली ही इथून बदलणार आहे.

Repeat this to your children while learning online | ऑनलाईन शिक्षण घेताना मुलांना पुन्हा पुन्हा हे सांगा.. करायला लावा

ऑनलाईन शिक्षण घेताना मुलांना पुन्हा पुन्हा हे सांगा.. करायला लावा

googlenewsNext

प्रमोद देशमुख
(मुख्याध्यापक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड)

नागपूर: ऑनलाइन शिक्षण हे नेहमीच्या शिक्षणापेक्षा वेगळं आहे हे तर उघड आहे. आज थोडाफार का होईना शिक्षकांनासुद्धा ऑनलाइन क्लास घेण्याचा अनुभव मिळाला किंवा शिकता आलं हे महत्त्वाचं. कोरोना हे वादळ लवकर संपणारे नाही. त्यामुळे या रोगाला सोबत घेऊनच पुढचे पाऊल असणार आहे. शाळा जरी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सुरू होतील तरी काळजी घेऊनच एक एक पाऊल पुढे सर्वांना चालायचं आहे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वांनी पुढे जायचं आहे. परंतु शाळा सुरू होतील मात्र पालकांना शिक्षकांना व समाजातील सर्व घटकांना जास्तीची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
शाळा ऑनलाईन असो अथवा ऑफलाईन असो या कोरोना विषाणूजन्य परिस्थितीत सर्वांना खबरदारी घेणे फार आवश्यक आहे सर्वांची जीवनशैली ही इथून बदलणार आहे.

ऑफलाईन शिक्षण घेताना घ्यावयाची खबरदारी
टप्प्याटप्प्याने जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा समोर समूह संसर्ग म्हणजेच कोरोनाची लागण हा धोका टाळण्यासाठी खालील खबरदारी घेणे गरजेचे आहे
१) मास्क घालणे अनिवार्य करणे गरजेचे आहे.
२) वारंवार हात धुणे आवश्यक आहे.
३) विद्यार्थ्यांशी संवाद मास्क घालून व एक मिटर अंतर ठेवूनच झाला पाहिजे.
४) कोणत्याही वस्तूची आदान-प्रदान करू नये.
५) विद्यार्थी आजारी असल्यास शाळेत पाठवू नये.
६) हात धुतल्या शिवाय तोंडाला, नाकाला व डोळ्याला स्पर्श करू नये.
७) स्वत:च्या वस्तूचा वापर स्वत: करावा.
८)आपले हात साबणाने किंवा पाण्याने कमीत कमी पंधरा ते वीस सेकंद धुवा साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तर कमीत कमी 60% अल्कोहल असलेले हॅन्ड सॅनीटायझर वापरा.
९) आजारी असलेल्या लोकांशी संपर्क टाळा.

ऑनलाईन शिक्षण घेताना घ्यावयाची खबरदारी
ऑनलाईन शिक्षण घेताना आत्ताच्या कठीण परिस्थितीत आपल्या मुलांना सगळीकडेच सोबतीची गरज आहे या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून काही टिप्स महत्त्वाच्या आहेत.
१) रूटीन तयार करणे.
ज्या शाळा ऑनलाईन सुरू आहेत त्यांच्या वेळा निश्चित केलेल्या असतातच पण इतर काही ऑनलाईन मटेरियल असेल त्यात व्हिडीओ बघणे, ऐकणे या गोष्टीचा समावेश असेल तर त्याचीही वेळ निश्चित केली पाहिजे म्हणजे दिवसभरात या गोष्टी किती वेळा आणि कधी करायच्या हे ठरवून ठेवणे महत्त्वाचे आहे.
२) एकमेकांशी मोकळे बोला
मुलांना प्रश्न विचारू द्या त्यांच्या भावना व्यक्त करू द्या सध्याच्या एकूण परिस्थितीत सर्वांवर तणाव असताना प्रत्येक मुलाची तान हाताळण्याची पद्धत वेगळी असते ताण हलका करण्यासाठी त्यांना समजून दिलासा देणे अतिशय गरजेचे आहे.
३) वेळ द्या.
पालकांनी मुलांसाठी वेळ देणे गरजेचे आहे ऑनलाइन प्रक्रियेत मुलांना एकटे सोडू नका सोबत राहून त्याची आवड वाढवा त्यांच्यासोबत गोष्टी करा अथवा गोष्टी सांगा.
४) मुलांची ऑनलाईन सुरक्षा
नेहमीपेक्षा मुलं जास्त ऑनलाईन आहेत अशा वेळी त्यांच्या ऑनलाईन सुरक्षेकडे लक्ष द्या. इंटरनेटवरचे धोके मुलांना समजून सांगा वयानुसार साईट्स , मनोरंजनाच्या गोष्टी ते काय बघत आहे याकडे लक्ष ठेवा.
५) मुलांच्या शाळेच्या संपर्कात राहा.
ऑनलाईन शिक्षण सुरू असताना शाळेच्या शिक्षकाच्या संपर्कात राहणे व कोणत्याही कारणासाठी शिक्षकांशी संपर्क, संवाद करणे गरजेचे आहे.
शाळा ऑफलाईन असो अथवा ऑनलाईन असो ही काळजी सर्व समाजघटकांना निदान इथपासून वर्ष दोन वर्ष घेणे गरजेचे आहे. म्हणजेच नवीन जीवनशैली अंगीकारणे अपेक्षित आहे. शासन प्रशासनाला स्वत: जबाबदारी स्वीकारून सर्व पूर्ववत आणणे गरजेचे आहे. कुठल्या एखाद्या घटनेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य वेशीला टांग ता येणार नाही म्हणून नियमांचं बंधन घालून सर्व हळु हळू पुर्ववत आणणे फार आवश्यक आहे.

 

 

Web Title: Repeat this to your children while learning online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.