नागपूर रेल्वेस्थानकावर साकारणार संत्र्याची प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:25 AM2018-03-24T10:25:23+5:302018-03-24T10:25:29+5:30

भारतीय रेल्वेच्यावतीने देशभरातील ६०० रेल्वेस्थानकाच्या मुख्य भागात स्थानिक संस्कृती, इतिहासाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील रेल्वेस्थानकावर संत्र्याची प्रतिकृती लावण्यात येणार आहे.

The replica of the orange of the Nagpur railway station | नागपूर रेल्वेस्थानकावर साकारणार संत्र्याची प्रतिकृती

नागपूर रेल्वेस्थानकावर साकारणार संत्र्याची प्रतिकृती

Next
ठळक मुद्देवर्धा, राजनांदगाव रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय रेल्वेच्यावतीने देशभरातील ६०० रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यानुसार रेल्वेस्थानकाच्या मुख्य भागात स्थानिक संस्कृती, इतिहासाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील रेल्वेस्थानकावर संत्र्याची प्रतिकृती लावण्यात येणार आहे. या बाबीचा खुलासा रेल्वे मंत्रालयाच्यावतीने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या माध्यमातून करण्यात आला आहे. एवढेच नाही तर पर्यटन, धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक स्थान असलेल्या ९० रेल्वेस्थानकांचा कायापालट करण्याची योजना रेल्वेने आखली आहे. या रेल्वेस्थानकांच्या यादीत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील वर्धा आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील राजनांदगाव रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. या रेल्वेस्थानकांना सुंदर बनविण्यासोबतच येथे प्रवासी सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.

Web Title: The replica of the orange of the Nagpur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.