‘जिका’चे प्रतिनिधी नागपुरात : नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:45 PM2019-04-23T23:45:31+5:302019-04-23T23:46:36+5:30
नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या विकास आराखड्यासाठी राष्ट्रीय नदी संरक्षण निदेशालयाकडून १२५२.३३ कोटींची मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ अर्थसाहाय्य करणार आहे. याबाबत २८ नोव्हेंबर २०१८ला जिका आणि महापालिका यांच्यात करार करण्यात आला. मंगळवारी जिका मुख्यालयातील दक्षिण आशिया विभाग (भारत/भूतान)चे उपसहायक संचालक झावझा अंग व दक्षिण आशिया विभागाचे कोयामा हरूका यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या विकास आराखड्यासाठी राष्ट्रीय नदी संरक्षण निदेशालयाकडून १२५२.३३ कोटींची मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ अर्थसाहाय्य करणार आहे. याबाबत २८ नोव्हेंबर २०१८ला जिका आणि महापालिका यांच्यात करार करण्यात आला. मंगळवारी जिका मुख्यालयातील दक्षिण आशिया विभाग (भारत/भूतान)चे उपसहायक संचालक झावझा अंग व दक्षिण आशिया विभागाचे कोयामा हरूका यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी चर्चा केली.
नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात जिकाकडून निप्पॉन कोई इंजिनिअरिंग कन्सलटंटची नियुक्ती करण्यात आली आहे. या चमूचे ९ जानेवारीपासून महापालिकेत काम सुरू आहे. या कामाचाही प्रतिनिधींनी आढावा घेतला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त व नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाचे अध्यक्ष राम जोशी, तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. इसराईल, जिकाने नियुक्त केलेल्या निप्पॉन कोई, इंजिनिअरींग कन्सलटंटचे ताकामासा निशिकावा, एनजेएसचे प्रकल्प सल्लगार विद्याधर सोनटक्के, नागनदी प्रकल्प अंमलबजावणी चमूच्या सदस्य डॉ. प्रणिता उमरेडकर, मो. शफीक, संदीप लोखंडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, आर.डी. राऊत, आदी उपस्थित होते.