२१ बौद्ध राष्ट्रांचे प्रतिनिधी येणार नागपुरात; दीक्षाभूमीला देणार भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2023 09:01 PM2023-06-23T21:01:00+5:302023-06-23T21:01:22+5:30

Nagpur News गगन मलिक फाउंडेशन इंडिया, सर्वधर्म समभाव शांती संमेलन व जागतिक शांतता पुरस्कार सोहळा २०२३ चे आयोजन मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आमला शहरात २५ जून रोजी करण्यात आले आहे.

Representatives of 21 Buddhist nations in Nagpur tomorrow; A gift to Dikshabhumi | २१ बौद्ध राष्ट्रांचे प्रतिनिधी येणार नागपुरात; दीक्षाभूमीला देणार भेट

२१ बौद्ध राष्ट्रांचे प्रतिनिधी येणार नागपुरात; दीक्षाभूमीला देणार भेट

googlenewsNext

नागपूर : गगन मलिक फाउंडेशन इंडिया, सर्वधर्म समभाव शांती संमेलन व जागतिक शांतता पुरस्कार सोहळा २०२३ चे आयोजन मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आमला शहरात २५ जून रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे २१ बौद्ध देशांतून प्रतिनिधी शनिवारी नागपुरात येणार आहेत. दरम्यान, रविवारी ते दीक्षाभूमीला भेट देतील.

श्रीलंकेचे सामाजिक न्यायमंत्री विजयदासा राजबक्षे, लाइट एशिया फाउंडेशन श्रीलंकाचे अध्यक्ष नवीन गुणरत्ने, वैयक्तिक सहायक पंतप्रधान कार्यालय श्रीलंका सोक्या चोम, थायलंडचे बौद्ध विश्व आघाडीचे अध्यक्ष डॉ.पोर्नचाई पियापोंग, सिस्टर मिथिला (बांगलादेश), सबुज बरुवा (बांगलादेश), सिस्टर निन्ये (म्यानमार), डॉ.ली.कीट यांग (दुबई), फाय यान (व्हिएतनाम), डॉ.योंग मून (दक्षिण कोरिया), कॅप्टन नॅटकीट (थायलंड), डॉ.पोंगसांग (थायलंड) आणि इतर देशांतील बौद्ध प्रतिनिधी येणार आहेत.

हे सर्व बौद्ध प्रतिनिधी २५ जून रोजी सकाळी ७ वाजता दीक्षाभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन करतील. यानंतर, ते बैतूलकडे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना होतील. यावेळी गगन मलिक फाउंडेशन इंडियाचे अध्यक्ष गगन मलिक उपस्थित राहतील, अशी माहिती गगन मलिक फाउंडेशन इंडियाचे समन्वयक नितीन गजभिये यांनी दिली.

Web Title: Representatives of 21 Buddhist nations in Nagpur tomorrow; A gift to Dikshabhumi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.