प्रजासत्ताक दिनी दिल्ली-नागपूर विमानांच्या उड्डाणांवर होणार परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 09:04 PM2019-01-23T21:04:54+5:302019-01-23T21:06:34+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी जवळपास दोन तास विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. २६ जानेवारीला सकाळी १०.३० ते दुपारी १२.१० पर्यंत एरोस्पेस प्रतिबंधामुळे दिल्लीहून रवाना होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या अनेक उड्डाणांच्या वेळेत बदल होऊ शकतो. यामध्ये दिल्लीहून नागपुरात येणाऱ्या दोन विमानांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी जवळपास दोन तास विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. २६ जानेवारीला सकाळी १०.३० ते दुपारी १२.१० पर्यंत एरोस्पेस प्रतिबंधामुळे दिल्लीहून रवाना होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या अनेक उड्डाणांच्या वेळेत बदल होऊ शकतो. यामध्ये दिल्लीहून नागपुरात येणाऱ्या दोन विमानांचा समावेश आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे वायुसेनेच्या विमानांचा हवाई अभ्यास सुरू आहे. याच कारणामुळे एरोस्पेसचा उपयोग काही तासांसाठी प्रतिबंधित ठेवण्यात येत आहे. बुधवारी दुपारी इंडिगोचे ६ई१३५ दिल्ली-नागपूर विमान १.१६ तास उशिराने दुपारी १२.१० ऐवजी १.२६ वाजता नागपुरात पोहोचले. तर इंडिगो एअरलाईन्सच्या स्थानिक स्टेशन मॅनेजर कार्यालयातर्फे सांगण्यात आले की, आम्हाला एरोस्पेस प्रतिबंधाची काहीही माहिती नाही. दिल्लीहून नागपुरात सकाळी ९.४० वाजता उड्डाण भरणाऱ्या विमानाला प्रजासत्ताक दिनामुळे उशीर होऊ शकतो. अन्य विमान कंपन्यांनी एरोस्पेस क्लोझरसंदर्भात प्रवाशांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
अन्य उड्डाणांना उशीर
बुधवारी इंडिगोचे ६ई८१६ कोची-नागपूर विमान २.२६ तास उशिराने अर्थात सकाळी १०.५० ऐवजी दुपारी १.१६ वाजता नागपुरात आले. ६ई१३४ पुणे-नागपूर ४१ मिनिटे उशिराने दुपारी १.११ वाजता पोहोचले. तसेच जी८-८१२ बेंगळुरू-नागपूर ४९ मिनिटे उशिराने रात्री जवळपास १.३० वाजता आले.