निवडणुकीसाठी १२०० वाहनांची आवश्यकता, आतापर्यंत ५० वाहने जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:11 AM2019-03-11T10:11:12+5:302019-03-11T10:13:22+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी १२०० वाहनांची आवश्यक लागणार आहे. परंतु आतापर्यंत केवळ ५० वाहने जमा झाली आहेत.

The requirement of 1200 vehicles for elections, 50 vehicles deposited so far | निवडणुकीसाठी १२०० वाहनांची आवश्यकता, आतापर्यंत ५० वाहने जमा

निवडणुकीसाठी १२०० वाहनांची आवश्यकता, आतापर्यंत ५० वाहने जमा

Next
ठळक मुद्देनोटीस पाठवणारमंगळवारपासून जप्ती मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी १२०० वाहनांची आवश्यक लागणार आहे. परंतु आतापर्यंत केवळ ५० वाहने जमा झाली आहेत. वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने शंभरावर विभागांना निवडणूक विभागाकडून नोटीस पाठविण्यात येणार असून सोमवारी वाहन जमा न झाल्यास मंगळवारपासून वाहन जप्ती मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निवडणुकीदरम्यान होणाऱ्या प्रचार सभांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच इतर कामासाठी निवडणूक विभागाला १२०० वाहनांची आवश्यकता आहे. यात ६०० जीप, ४५० बस, १०० ट्रक, २४ अ‍ॅम्ब्युलन्स तर २४ अग्निशमनच्या वाहनांचा समावेश आहे.
यात काही वाहने कंत्राटी घेण्यात येणार आहे. २५० वाहने ही शासकीय विभागांकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी विभागप्रमुखांना पत्र पाठविण्यात आले. मात्र आतापर्यंत फक्त ५० वाहने प्रशासनाकडे जमा झाली आहेत. विभागाकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे.
यामुळे निवडणूक प्रशासनाकडून जवळपास १०० विभागांना नोटीस पाठविणार असल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारला वाहन जमा न झाल्यास मंगळवारपासून वाहन जप्तीची मोहीत सुरू करण्यात येणार आहे.
यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने एक पथक तयार केले असून यात ट्राफिक, आरटीओ तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा समोवश असणार आहे.

Web Title: The requirement of 1200 vehicles for elections, 50 vehicles deposited so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.