विदर्भातील तुमसरमध्ये रेअर अर्थ मेटलचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:20 AM2018-12-04T00:20:26+5:302018-12-04T00:23:05+5:30

पृथ्वीच्या भूगर्भात विविध मेटल आणि मिनरलाचा खजिना आहे. यात अतिशय बहुमूल्य रेअर अर्थ मेटल (आरईई) याचा शोध भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग (जीएसआय) विदर्भातील तुमसर भागात घेत आहे. देशात ग्रीन एनर्जीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. यासाठी रेअर अर्थ मेटल अतिशय उपयुक्त आहे. विदर्भातील तुमसर सोबतच मध्यप्रदेश व छत्तीसगड येथे सुद्धा जीएसआय याचा शोध घेत आहे.

Research of Rare Earth Metal in Tumsar in Vidarbha | विदर्भातील तुमसरमध्ये रेअर अर्थ मेटलचा शोध

विदर्भातील तुमसरमध्ये रेअर अर्थ मेटलचा शोध

googlenewsNext
ठळक मुद्देजीएसआयच्या अधिकाऱ्यांची माहिती : १० वर्षात ५ बिलियन टन संसाधनाचे संशोधन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पृथ्वीच्या भूगर्भात विविध मेटल आणि मिनरलाचा खजिना आहे. यात अतिशय बहुमूल्य रेअर अर्थ मेटल (आरईई) याचा शोध भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग (जीएसआय) विदर्भातील तुमसर भागात घेत आहे. देशात ग्रीन एनर्जीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. यासाठी रेअर अर्थ मेटल अतिशय उपयुक्त आहे. विदर्भातील तुमसर सोबतच मध्यप्रदेश व छत्तीसगड येथे सुद्धा जीएसआय याचा शोध घेत आहे.
रेअर अर्थ मेटलचा मोठा स्रोत चीनमध्ये आहे. सद्यस्थितीत या मेटलसाठी भारत चीनवर निर्भर आहे. या मेटलचा मोबाईल, बॅटरी, चीप, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्हसह अन्य इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. जीएसआयचे अप्पर महानिदेशक डी. मोहन राज म्हणाले की, येणाऱ्या वर्षात जीएसआय रेअर अर्थ मटेरियल मध्ये काही डिपॉझिट देऊ शकणार आहे. केरळच्या सीमावर्ती भागात याचा शोध सुरू आहे. येथून .०९ टक्के रेअर मेटल मिळाले आहे. यासंदर्भात जीएसआयचे संचालक मिलिंद धकाते म्हणाले की, आम्ही रेअर अर्थ मेटलचा सोर्स असलेल्या दगडाचा शोध घेत आहे. रेअर अर्थ मेटलला ग्रेनाईड, कार्बोनाईट व सेग्मेटाईटमध्ये शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्याचे सॅम्पलिंग करून वैज्ञानिकांकडून अहवाल घेतले जात आहे.
सोमवारी सेमिनरी हिल्स येथील जीएसआयच्या सेंट्रल रिजनच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली. यावेळी सेंट्रल रिजनचे अप्पर महानिदेशक जी. विद्यासागर व वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ संजय वानखेडे उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या मध्य विभागातर्फे राबविण्यात येणारे संशोधन प्रकल्प आणि उपक्रमांची माहिती देण्यात आली. जीएसआयचे अधिकारी म्हणाले की, मध्यप्रदेशातील दोन सोन्याच्या खाणी राज्य सरकारला लिलावासाठी उपलब्ध करून दिल्या आहे. त्याचबरोबर मध्य विभागात थर्मल एनर्जी संदर्भात एनटीपीसीसोबत संयुक्त उपक्रम चालविण्यात येत आहे. जीएसआय मिनरल्सच्या खाणीचा शोध घेऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करीत मिशन-२ तयार झालेले ब्लॉक सरकारला लिलावासाठी उपलब्ध करून देणार आहे.
 पृष्ठभागावरील रसायनांचा अभ्यास
राष्ट्रीय भूरासायनिक मानचित्रण हा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील रसायनांचा अभ्यास करून त्यांचे नकाशे तयार करण्यात येत आहेत. २००० साली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला. आतापर्यंत १,१७,०२९ वर्ग किलोमीटर इतक्या क्षेत्राचे नकाशे तयार करण्यात आले आहेत.
नागपूर भूकंपापासून सेफ
जीएसआयने देशातील भूकंप संभावित क्षेत्राचे पाच झोन तयार केले आहे. यात झोन पाचमध्ये येणारे क्षेत्र हे भूकंप प्रभावित आहे. यामध्ये उत्तरपश्चिम भागाचा समावेश आहे. नागपूर हे झोन दोनमध्ये येत असून, भूकंपाच्या घटनांपासून अतिशय सेफ आहे. जीएसआय भूकंपसदृश लक्षणाचा अभ्यास मोठ्या शहरामध्ये करीत आहे. मुंबई, पुणे, जबलपूर, सातारा, कोयना, वारणा व मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये भूकंपामुळे धोक्यात येणाऱ्या सूक्ष्म भूभागांचा अभ्यास पूर्ण झाला आहे. जीएसआयने आता नाशिक शहराचा अभ्यास सुरू केला आहे.
५० वर्ष पुरेल एवढा कोळसा
जीएसआयच्या सर्व रिजनमध्ये सर्वाधिक कोळसा सेंट्रल रिजनमध्ये आहे. भूवैज्ञानिक डी. मोहन राज म्हणाले की, देशाला आणखी ४० ते ५० वर्ष पुरेल एवढा कोळसा उपलब्ध आहे.
 जीएसआयच्या सेंट्रल रिजनची १० वर्षातील उपलब्धता
सेंट्रल रिजन अंतर्गत येणाऱ्या तीनही राज्यातील स्पेशल थिमॅटीक मॅपिंगद्वारे ३७०५८ वर्ग किलोमिटरच्या क्षेत्राचे सर्वेक्षण.
१,१७,०२९ वर्ग किलोमिटरच्या क्षेत्राचे जियोकेमिकल मॅपिंग.
१२ खनिज वस्तू व दोन ऊर्जा स्रोतांसाठी खनिज अन्वेषण करीत आहे.
बैतूलमध्ये ग्रॅफाईट, ठाणेवासना येथे तांबा भंडार, महाराष्ट्रातील गुगलडोह मध्ये मॅगनीज भंडार, उत्तर व दक्षिण पाखरीटोला येथे बॉक्साईट भंडार, छत्तीसगड व मध्यप्रदेशातील छत्तरपूर, झाबुआ व सागरमध्ये फास्फोराईट व मॅगनीज, बैतूल व छिंदवाडामध्ये बेसमेटलसह बहुमूल्य धातू व टिकमगड तसेच ग्वाल्हेरमध्ये लोखंडाचे उत्खनन केले आहे.
गेल्या १० वर्षात सेंट्रल रिजनने ५ बिलियन टन संसाधनांचे संशोधन केले आहे.

 

Web Title: Research of Rare Earth Metal in Tumsar in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.