कृषी क्षेत्रात संशोधन होणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:57 AM2017-11-12T00:57:05+5:302017-11-12T00:57:16+5:30

शेतकºयांचे निसर्गावरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी कृषी विभागात संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केले.

Research required in the field of agriculture | कृषी क्षेत्रात संशोधन होणे आवश्यक

कृषी क्षेत्रात संशोधन होणे आवश्यक

Next
ठळक मुद्देकार्यशाळा : अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकºयांचे निसर्गावरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी कृषी विभागात संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केले.
रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या अ‍ॅग्रोव्हीजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनातील कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
गिरीश बापट म्हणाले, संशोधनाच्या माध्यमातून कोणत्या वेळेला कोणत्या पिकाची रोवणी करावी, कोणते बीज वापरावे तसेच पूरक व्यवसाय व त्याचे फायदे याविषयी योग्य माहिती अ‍ॅग्रोव्हीजनच्या माध्यमातून शेतकºयांना मिळत आहे. कृषी प्रदर्शनामुळे शेतकºयांना येथेच अनुभवी शेती तज्ञांंचे मार्गदर्शन मिळत आहे. बदलत्या हवामानानुसार शेतीत करावयाच्या बदलांची माहिती तसेच यशस्वी शेतकºयांच्या यशोगाथा अनुभवयाला मिळत आहे. मधमाशी पालन, हळद व आले उत्पादन प्रकिया तंत्रज्ञान, फूलशेती, डाळींब लागवड, मत्स्यपालन, शेळीपालन या समवेत कीटकनाशकांच्या जबाबदार वापराविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे.
सद्यस्थितीत राज्यात रेशीम उद्योगामध्ये चांगली संधी निर्माण होत आहे. या विषयी शेतकºयांना येथे मार्गदर्शन मिळत आहे. यासाठी जास्तीत जास्त शेतकºयांनी या मार्गदर्शनाचा उपयोग करुन कृषी उत्पादकता कशी वाढीस लागेल याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शेतकºयांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे कृषी प्रदर्शन
अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी हे केवळ कृषी प्रदर्शन नसून शेतकºयांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे हे आयोजन आहे असे सांगितले. या कार्यशाळेत मिळणाºया मार्गदर्शनातून अनुभव संपन्न शेतकरी तयार होत असून त्यांना या प्रदर्शनातून काहीतरी नवी शिकायला मिळत आहे असे बापट यावेळी म्हणाले.

Web Title: Research required in the field of agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.