पारशिवनी तालुक्यातील १० ग्रा.पं.चे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:17+5:302021-02-05T04:38:17+5:30
पारशिवनी : जानेवारी महिन्यात पारशिवनी तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोमवारी तहसील कार्यालयात ...
पारशिवनी : जानेवारी महिन्यात पारशिवनी तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोमवारी तहसील कार्यालयात दुपारी जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता या दहाही ग्रा.पं. क्षेत्रात आता सरपंचपदाच्या निवडणुकीकडे सा-यांचे लक्ष लागले आहे. पारशिवनी तालुक्यात दहाही ग्रा.पं.वर महाविकास आघाडीने वर्चस्व असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीत सरपंचपद कोणत्या गटाला मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तालुक्यातील ग्रा.पं.च्या सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे : १) बोरी (सिंगारदीप)- अनुसूचित जाती महिला, २) सुवरधरा - अनुसूचित जमाती महिला, ३) ईटगाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ४) माहुली- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ५) खेडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ६) पिंपळा - सर्वसाधारण, ७) खंडाळा (घटाटे)- सर्वसाधारण, ८) नवेगाव खैरी- सर्वसाधारण, ९) आमगाव- सर्वसाधारण महिला, १०) निमखेडा- सर्वसाधारण महिला. विशेष म्हणजे या सर्व ग्रा.पं.चे आरक्षण पूर्वीच्या आरक्षणाप्रमाणेच आहे. यावेळी तहसीलदार वरुणकुमार सहारे, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.