कुही तालुक्यातील ५९ ग्रा.पं.चे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:37 AM2021-02-05T04:37:27+5:302021-02-05T04:37:27+5:30

कुही : कुही तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी जाहीर करण्यात आले.यात हे आरक्षण २०२५ पर्यंत लागू राहणार आहे. ...

Reservation of 59 Gram Panchayats in Kuhi taluka announced | कुही तालुक्यातील ५९ ग्रा.पं.चे आरक्षण जाहीर

कुही तालुक्यातील ५९ ग्रा.पं.चे आरक्षण जाहीर

googlenewsNext

कुही : कुही तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी जाहीर करण्यात आले.यात हे आरक्षण २०२५ पर्यंत लागू राहणार आहे. येत्या ११ फेब्रुवारीला गत महिन्यात निवडणूक झालेल्या २४ ग्रा.पं.च्या सरपंच व उपसरपंचपदाची निवड होणार आहे. त्यासाठी राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. बुधवारी तहसील कार्यालयातील स्वामी मुकुंदराज सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. यात विविध गटात ३० जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या तर उर्वरित २९ जागा पुरुषासाठी राखीव आहेत. ८ डिसेंबरला काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीचीच आज पुनरावृत्ती झाली आहे. कुठल्याही ग्रा.पं.मधील सरपंचपदाचे आरक्षण बदलले नाही. तहसीलदार बाबाराव तीनघसे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वामन पंचबुद्धे व अंबादे याप्रसंगी उपस्थित होते. ५९ ग्रा.पं.मध्ये अनुसूचित जातीसाठी १२ ग्रा.पं.राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यातील सहा जागा महिलांसाठी राखीव आहेत तर उर्वरित जागा खुल्या वर्गासाठी राखीव आहेत. यात परसोडी (राजा),पचखेडी,साळवा,ससेगाव,कुजबा व माळणी व महिलांसाठी देवळी (खुर्द), पारडी, इसापूर (नवेगाव), म्हसली, मुसळगाव व आकोली ग्रा.पं.चा समावेश आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १६ ग्रा.पं.राखीव करण्यात आल्या आहेत. यात खुल्या वर्गासाठी डोडमा,बानोर, फेगड, सोनेगाव, रुयाड, चितापूर, अंबाडी, चिकना ग्रा.पं.राखीव आहेत. अनु. जाती महिलासाठी ग्रा.पं.राखीव आहेत. यात हरदोली (नाईक), तारोली-सावंगी, वडेगाव (मांढळ), राजोली, कुचाडी, सातारा, विरखंडी व चापेगडी ग्रा.पं.चा समावेश आहे. सर्वसाधारण गटासाठी २९ ग्रामपंचायती राखीव करण्यात आल्या असून यात १४ ग्रा.पं. मध्ये पुरुष सरपंच बनतील. यात तारणा,वेळगाव, हरदोली(राजा),डोंगरमौदा,भटरा,वग,देवळी(कला),वेलतुर, शिकारपूर, तुडका, गोठणगाव, खोकरला, कऱ्हांडला, आंभोरा (खुर्द) ग्रा.पं.चा समावेश आहे. महिलाकरिता राखीव ग्रा.पं.मध्ये मांढळ, किन्ही, माजरी, खोबना,अडम,तितुर,वडेगाव (काळे), सिल्ली, राजोला, बोरी नाईक, गोन्हा,सिर्सी, जीवनापूर,नवेगाव -उमरी,हरदोली (पुनर्वसन) ग्रा.पं.चा समावेश आहे. तालुक्यात निवडणूक झालेल्या २४ ग्रा.पं.मध्ये सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा भाजपा समर्थीत गटाने केला आहे; मात्र सरपंच पदाच्या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Reservation of 59 Gram Panchayats in Kuhi taluka announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.