मुंबई हावडा मेलला नागपुरातून आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 11:39 PM2020-09-02T23:39:25+5:302020-09-02T23:41:35+5:30

मुंबई ते हावडा मेल विशेष रेल्वेगाडीला २ सप्टेबरपासून नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर शहरातून मुंबईकडे जाण्यासाठी तिकीट आरक्षणास प्रारंभ झाला आहे.

Reservation from Nagpur to Mumbai Howrah Mail | मुंबई हावडा मेलला नागपुरातून आरक्षण

मुंबई हावडा मेलला नागपुरातून आरक्षण

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मुंबई ते हावडा मेल विशेष रेल्वेगाडीला २ सप्टेबरपासून नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर शहरातून मुंबईकडे जाण्यासाठी तिकीट आरक्षणास प्रारंभ झाला आहे.
राज्य सरकारने आंतरजिल्हा प्रवास बंदी उठवली आहे. त्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय राज्यात आता कोणालाही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासची आवश्यकता नाही. मुंबईकडे जाणारी केवळ एक रेल्वेगाडी नागपूरमार्गे आहे. यात जेवढे थांबे आहेत. त्या सर्वांसाठी तिकीट आरक्षण सुरू झाले आहे.
जिल्हाबंदीमुळे रेल्वे गाडी क्रमांक ०२८१०/०२८०९ हावडा-मुंबई मेलला नागपुरातून तिकीटाचे आरक्षण नव्हते. राज्य सरकारने जिल्हाबंदी उठवल्याने या गाडीसाठी आजपासुन आरक्षण सुरु झाले. मात्र, पुणे, मुंबई ते नागपूर या मार्गावर किंवा इतर कोणतीही नवीन गाडी सुरू झालेली नाही, असे मध्य रेल्वेचे मख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

Web Title: Reservation from Nagpur to Mumbai Howrah Mail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.