नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 07:47 PM2019-11-19T19:47:53+5:302019-11-19T19:52:52+5:30
राज्यातील ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मंगळवारी मुंबईत काढण्यात आली. यात नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अनुसूचित जाती (महिला) हे आरक्षण कायम ठेवण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मंगळवारी मुंबईत काढण्यात आली. यात नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अनुसूचित जाती (महिला) हे आरक्षण कायम ठेवण्यात आले. नागपूर जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांचा अधिकृत कार्यकाळ २०१७ मध्ये संपुष्टात आला. त्याचवेळी नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण काढण्यात आले होते. मात्र आरक्षणावरून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने जिल्हा परिषदेची निवडणूक तब्बल अडीच वर्षापर्यंत रखडली. सध्या जिल्हापरिषद बर्खास्त करण्यात आली असून, कार्यभार प्रशासकाकडे आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या हालचाली वाढल्या आहे. जिल्हा प्रशासनाने मतदार याद्या प्रकाशित केल्या आहे. आता अध्यक्ष पदासाठीचे आरक्षणही निघाले आहे. बुधवारी आरक्षणाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यानंतर आयोग काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रवर्गनिहाय आरक्षण
अनुसूचित जाती ५
अनु. जाती (महिला) ५
अनुसूचित जमाती ३
अनु. जमाती (महिला) ४
इतर मागास प्रवर्ग ८
ओबीसी (महिला) ८
सर्वसाधारण १३
सर्वसाधारण (महिला) १२
सर्कल निहाय आरक्षण
नरखेड तालुका
बेलोना (अनू.जाती महिला),
सावरगांव (ना.मा.प्र. महिला),
जलालखेडा (अनू. जमाती)
भिष्णूर (ना.मा.प्र. महिला)
काटोल तालुका
येनवा (ना.मा.प्र.),
पारडसिंगा (ना.मा.प्र.)
मेटपांजरा (सर्वसाधारण)
कोंढाळी (सर्वसाधारण महिला)
कळमेश्वर तालुका
तेलकामठी (अनू. जमाती महिला)
धापेवाडा (अनू. जाती)
गोंडखैरी (अनु. जमाती)
सावनेर तालुका
बडेगांव (सर्वसाधारण महिला)
वाकोडी (ना.मा.प्र. महिला)
केळवद (ना.मा.प्र.)
पाटणसावंगी (अनू. जमाती महिला)
वलनी (सर्वसाधारण)
चिचोली (अनु. जमाती महिला)
पारशिवनी तालुका
माहुली (सर्वसाधारण)
करंभाड (ना.मा.प्र. महिला)
गोंडेगाव (सर्वसाधारण)
टेकाडी (अनू. जाती महिला)
रामटेक तालुका
वडंबा (सर्वसाधारण)
बोथीयापालोरा (ना.मा.प्र.)
कांद्री (सर्वसाधारण)
मनसर (अनू. जाती)
नगरधन (सर्वसाधारण)
मौदा तालुका
अरोली (ना.मा.प्र.)
खात (सर्वसाधारण महिला)
चाचेर (सर्वसाधारण)
तारसा (सर्वसाधारण महिला)
धानला (सर्वसाधारण)
कामठी तालुका
कोराडी (सर्वसाधारण)
येरखेडा (सर्वसाधारण)
गुमथळा (ना.मा.प्र.)
वडोदा (ना.मा.प्र. महिला)
नागपूर तालुका
गोंधणी रेल्वे (ना.मा.प्र. महिला)
दवलामेटी (सर्वसाधारण)
सोनेगांव निपानी (अनू. जाती महिला)
खरबी (अनू. जाती)
बेसा (अनू. जाती महिला)
बोरखेडी फाटक (सर्वसाधारण महिला)
हिंगणा तालुका
रायपूर (सर्वसाधारण)
निलडोंह (ना.मा.प्र.)
डिगडोह (ना.मा.प्र. महिला)
डिगडोह इसासनी (ना.मा.प्र. महिला)
सातगाव (अनू. जमाती महिला)
खडकी (सर्वसाधारण महिला)
टाकळघाट (अनु.जाती)
उमरेड तालुका
मकरधोकडा (सर्वसाधारण महिला)
वायगांव (सर्वसाधारण महिला)
सिर्सी (अनु. जाती)
बेला (सर्वसाधारण महिला)
कुही तालुका
राजोला (ना.मा.प्र.)
वेलतूर (सर्वसाधारण महिला)
सिल्ली (सर्वसाधारण महिला)
मांढळ (सर्वसाधारण महिला)
भिवापूर तालुका
कारगांव (अनू. जमाती)
नांद सर्कल (अनू. जाती महिला)