४८ ग्रा.पं.च्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:37 AM2021-02-05T04:37:38+5:302021-02-05T04:37:38+5:30

रामटेक : रामटेक तालुक्यातील ४८ ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. यात १५ जानेवारीला निवडणूक झालेल्या ...

Reservation for Sarpanch post of 48 Gram Panchayats announced | ४८ ग्रा.पं.च्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

४८ ग्रा.पं.च्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

Next

रामटेक : रामटेक तालुक्यातील ४८ ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. यात १५ जानेवारीला निवडणूक झालेल्या ९ ग्रा.पं.चाही समावेश आहे. हे आरक्षण २०२५ पर्यंत लागू राहणार आहे. मंगळवारी घनश्याम किंमतकर सभागृह येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. यात ५ ग्राम पंचायती अनु.जातीसाठी राखीव करण्यात आल्या. यातील ३ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनु.जमातीसाठी १९ ग्राम पंचायती राखीव करण्यात आल्या. यातील ९ जागी महिला सरपंच होणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १३ ग्राम पंचायती राखीव आहेत. यात सहा गावात महिला सरपंच होणार आहे. यासोबतच सर्वसाधारण गटातून ११ गावात सरपंच आरुढ होणार आहे. यात ५ ठिकाणी महिला सरपंच होणार आहे. तालुक्यातील ग्राम पंचायतीचे सरपंच आरक्षण पुढील प्रमाणे : अनु. जातीसाठी राखीव : हिवरा हिवरी, पथरई, महिलांसाठी - दाहोदा,पंचाळा बु.,खुमारी. अनु जमाती - वरघाट, पिपरिया, पिंडकापार लो., करवाही, सोनेघाट, पटगोवरी, लोहडोंगरी, आसोली, किरणापूर, डोंगरताल, महिलांसाठी राखीव- कट्टा, बांद्रा, पुसदा-२ , टांगला चिकनापूर, शीतलवाडी, बोरी, भिलेवाडा, खनोरा ,काचुरवाही. नागरिकांचा मागास प्रवर्ग : सालई, बोरडा, महादुला, मांद्री, खैरी बिजेवाडा, शिवनी (भों), पिंडकापार सोनपूर, महिलासाठी राखीव : पुसदा, कांद्री,नवरगाव, मुसेवाडी, डोंगरी, भंडारबोडी. सर्वसाधारण खुला प्रवर्ग : वडंबा, उमरी, मनसर ,आजनी, मानापूर. महिलांसाठी राखीव- बोथीयापालोरा, बेलदा, हिवराबाजार, नगरधन, देवलापार, चिचाळा या ग्रा.पं.चा समावेश आहे. तालुक्यात गत महिन्यात देवलापार,दाहोदा,पथरई, शिवनी (भों), पंचाळा बु.,मानापूर, चिचाळा, किरणापूर व खुमारी येथे ग्राम पंचायत निवडणूक झाली आहे. येथे सरपंच पदासाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे. यात भाजपा समर्थित गटाने ५ गावात तर काँग्रेस समर्थित गटाने ७ गावात विजय झाल्याचा दावा केला आहे; पण आता सरपंच पदाच्या निवडणुकीत कोणता गट बाजी मारेल, हे लवकरच कळेल.

Web Title: Reservation for Sarpanch post of 48 Gram Panchayats announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.