सरपंचपदाच्या आरक्षणाने दिग्गजांचे गणित बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:37 AM2021-02-05T04:37:07+5:302021-02-05T04:37:07+5:30
सावनेर : सावनेर तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी जाहीर करण्यात आले. २०२५ पर्यंत हे आरक्षण लागू असणार आहे. ...
सावनेर : सावनेर तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी जाहीर करण्यात आले. २०२५ पर्यंत हे आरक्षण लागू असणार आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनंतर तालुक्यातील काही दिग्गजांचे राजकीय गणित बिघडले आहे. प्रभारी तहसीलदार चैताली दराडे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. तालुक्यातील ग्रा.पं.चे आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती (जनरल) - सोनपूर, जैतपूर, रामपुरी, सिंदेवाणी, खैरी पंजाब, सिल्लोरी, वलनी, सिरोंजी. अनुसूचित जाती (महिला) - उमरी, वाघोडा, चिंचोली, भानेगाव, गुमगाव, खुर्सापार, जलालखेडा, कोच्छी. अनुसूचित जमाती (जनरल)- पोटा, पीपळा डाकबंगला, भेंडाळा. अनुसूचित जमाती (महिला) - माणेगाव, कोदेगाव, कुसुंबी, नांदोरी. नागरिकांचा मागास प्रवर्ग (जनरल) - गडमी, सावरमेंढा हत्तीसरा, उमरी (भ), इटनगोटी, सावंगी जोगा, बोरुजवाडा, येलतूर तिघई. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)- सर्रा, नागलवाडी, खापा, माळेगाव, खानगाव, गोसेवाडी, दहेगाव रंगारी, नांदागोमुख, इसापूर. सर्वसाधारण प्रवर्ग (जनरल): केळवद, सालई, बिचवा, सिल्लेवाडा, रोहना, टाकळी (भ), चांपा, ब्रह्मपुरी, आजनी, खुरजगाव, माळेगाव (जो), तेलंगखेडी, टेंभुरडोह, जटामखोरा, मंगसा, परसोडी. सर्वसाधारण (महिला)- खैरी ढालगाव, सावळी (मो), बडेगाव, नरसाळा, कोथुळना, किरणापूर, वाकोडी, रायवाडी, पटकाखेडी, कोटोडी वाकी खड्डूका, पाटणसावंगी, खुबाळा,गडेगाव असे आहेत.