नागपुरात निवासी डॉक्टर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:01 AM2018-09-28T00:01:42+5:302018-09-28T00:04:24+5:30

मेडिकलच्या निवासी महिला डॉक्टरने सर्जिकल ब्लेडने गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता मेडिकलच्या मार्ड वसतिगृहामध्ये ही घटना उघडकीस आली. सध्या तिची प्रकृती गंभीर असून मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. आत्महत्यामागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

The resident doctor in Nagpur tried to commit suicide | नागपुरात निवासी डॉक्टर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

नागपुरात निवासी डॉक्टर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देमेडिकलमधील घटना : सर्जिकल ब्लेडने कापला गळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलच्या निवासी महिला डॉक्टरने सर्जिकल ब्लेडने गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता मेडिकलच्या मार्ड वसतिगृहामध्ये ही घटना उघडकीस आली. सध्या तिची प्रकृती गंभीर असून मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. आत्महत्यामागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही. डॉ. अश्विनी मयूर शिंदे (राऊत) (२६) असे त्या डॉक्टर महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मूळच्या बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथील डॉ. अश्विनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कान, नाक व घसा या विषयात पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला होत्या. मेडिकलच्या परिसरातील मार्डच्या वसतिगृहातील खोली क्रमांक ४२ मध्ये राहत होत्या. डॉ. श्रुती तागडे आणि अन्य एक अशा दोन मैत्रिणी त्यांच्या सोबत राहायच्या. गुरुवारी सकाळी १० वाजले तरी डॉ. अश्विनी व्याख्यानाला (लेक्चरला) पोहचल्या नाही. त्यामुळे डॉ. श्रुती त्यांच्या रूमवर गेल्या. दार आतून बंद असल्यामुळे बराच वेळेपर्यंत त्यांनी दार ठोठावले. कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बाजूच्या खिडकीतून त्यांनी डोकावून बघितले असता अश्विनी पलंगावर पडून दिसल्या. त्यांच्या गळ्यातून रक्त वाहत होते. त्यामुळे डॉ. श्रुती यांनी आरडाओरड करून बाजूच्यांना गोळा केले. वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. वसतिगृहातील एका महिला कर्मचाºयाने तिच्या गळ्यातील रक्त बंद करण्यासाठी उशी दाबून धरली. इतरांच्या मदतीने तिला तातडीने थेट मेडिकलच्या शस्त्रक्रिया गृह ‘सी’मध्ये नेले. डॉ. राज गजभिये यांच्यासह वरिष्ठ डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. डॉ. अश्विनी यांनी स्वत:च्या हाताने सर्जिकल ब्लेडने गळा कापला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या तिच्यावर वॉर्ड क्रं. २९ मध्ये उपचार सुरू आहेत. परंतु बराच रक्तस्राव झाल्यामुळे तिची अवस्था गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अजनीचे पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये तसेच त्यांचे सहकारी घटनेची चौकशी करीत आहेत. या घटनेमुळे वैद्यकीय विद्यार्थी व निवासी डॉक्टरांना मोठा धक्का बसला आहे. रात्री उशिरा तिचे आईवडील आले. तूर्तास आत्महत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
डॉ. अश्विनी यांनी आपल्या गळ्याच्या उजव्या बाजूने वार केला. सुरुवातीला डाव्या हाताची असावी असा अंदाज व्यक्त केला. परंतु पोलिसांनी विचारपूस केल्यावर अंदाज खोटा ठरला. आत्महत्येच्या प्रयत्नात वापरण्यात आलेली सर्जिकल ब्लेड ही धारदार होती. यामुळे मेंदूला रक्त पुरवठा करणारी नस कापली गेली. डॉक्टरांनुसार सध्या तिची प्रकृती स्थिर असून पुढील २४ तास महत्त्वाचे आहेत.

 

Web Title: The resident doctor in Nagpur tried to commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.