नागपुरात मेयोतील निवासी डॉक्टराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 08:40 PM2019-07-05T20:40:51+5:302019-07-05T20:43:36+5:30

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेयो) पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन दोन महिन्यांचा कालावधी होत नाही तोच निवासी डॉक्टरने शुक्रवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने महाविद्यालय प्रशासनात खळबळ उडाली असून आत्महत्येमागील कारण काय, याचा शोध घेतला जात आहे.

Residential Doctor in Mayo at Nagpur committed suicide | नागपुरात मेयोतील निवासी डॉक्टराची आत्महत्या

नागपुरात मेयोतील निवासी डॉक्टराची आत्महत्या

Next
ठळक मुद्देदोन महिन्यांपूर्वीच घेतला होता ‘पीजी’ला प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेयो) पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन दोन महिन्यांचा कालावधी होत नाही तोच निवासी डॉक्टरने शुक्रवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने महाविद्यालय प्रशासनात खळबळ उडाली असून आत्महत्येमागील कारण काय, याचा शोध घेतला जात आहे.
डॉ. मनुकुमार वैद्य (२७) रा. कर्नाटक असे मृताचे नाव आहे. डॉ. मनुकुमार याने कर्नाटक येथून एमबीबीएसचे शिक्षण घेतले. ऑल इंडिया कोट्यातून त्याला पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (पीजी) दोन महिन्यांपूर्वीच नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. ‘पीजी’साठी त्याने स्त्री रोग व प्रसूती अभ्यासक्रम निवडला होता. प्राप्त माहितीनुसार, मेयोच्या जुन्या पीजी वसतिगृहातील खोली क्रमांक ३३ वर मनुकुमार आपल्या सहकाऱ्यासोबत राहायचा. ४ जुलैच्या रात्री त्याच्या सहकाºयाची ड्युटी वॉर्डात रात्रपाळीत होती. यामुळे तो खोलीवर एकटाच होता. दुसºया दिवशी, शुक्रवार ५ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजतापासून डॉ. मनुकुमार याची ड्युटी स्त्री रोग व प्रसूती विभागाच्या ‘ओपीडी’त होती. परंतु ९ वाजले तरी तो पोहचला नव्हता. यामुळे ‘युनिट -१’चे प्रमुख डॉ. प्रशांत उईके यांनी एका इन्टर्नला डॉ. मनुकुमारला फोन लावण्यास सांगितले. परंतु तो फोन उचलत नव्हता. यामुळे इन्टर्न त्याच्या खोलीवर गेला. बाहेरून आवाज देऊनही दरवाजा उघडत नव्हता. याची माहिती इन्टर्नने सुरक्षा रक्षकाला दिली. रक्षकाच्या मदतीने खोलीच्या समोरील खिडकी उघडली असताना डॉ. मनुकुमार जमिनीवर पडलेला होता. त्याच्या गळ्याभोवती फास लटकत होता. याची माहिती लागलीच वरिष्ठांना देण्यात आली. डॉ. मनुकुमारला तातडीने मेयोच्या अपघात विभागात आणले. येथे डॉक्टरांनी डॉ. मनुकुमारला मृत घोषित केले. या घटनेला घेऊन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, गळफास लावण्यापूर्वी डॉ. मनुकुमार आपल्या भावाशी मोबाईलवरून बोलला असल्याचे सांगण्यात येते.
मेयोचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, डॉ. मनुकुमार यानी गेल्या दोन महिन्यात महाविद्यालय प्रशासन किंवा निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’कडे कुणाविरुद्ध तक्रार केली नव्हती. त्याची वर्तणूकही सामान्य होती. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सोबतच त्याच्या कुटुंबाला बोलावून घेण्यात आले. नातेवाईक नागपुरात पोहचल्यावर शवविच्छेदन केले जाणार आहे.

Web Title: Residential Doctor in Mayo at Nagpur committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.