पर्यावरण दिनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:07 AM2021-06-06T04:07:11+5:302021-06-06T04:07:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘वृक्षवल्ली आम्हा साेयरे वनचरे...’ असा संदेश देत जिल्ह्यातील सामाजिक संघटना, शाळा-महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘वृक्षवल्ली आम्हा साेयरे वनचरे...’ असा संदेश देत जिल्ह्यातील सामाजिक संघटना, शाळा-महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयाेजन केले गेले. विविध संस्था, संघटनांच्या पुढाकारातून पर्यावरणदिनी वृक्षाराेपण करीत वृक्षसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमात मान्यवरांनी पर्यावरण दिनाचे महत्त्व पटवून देत माैलिक विचार मांडले.
...
प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्र, खापा
खापा : येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय सेवा केंद्र येथे पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विजया दीदी यांनी पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. मनुष्याला जगण्याकरिता लागणारा प्राणवायू हा वृक्षापासून मिळताे, त्यामुळे प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी आनंद मेनकुदळे, मिलिंद कापसे, सारंग आवते, राजू भाई, सुषमा दीदी, अनिता नाचणकर, आराध्या तडसे, बळीराम नाचणकर आदी उपस्थित हाेते.
....
राष्ट्रपिता जाेतिबा फुले अभ्यासिका, काटाेल
काटोल : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्थानिक राष्ट्रपिता जोतिबा फुले अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. दिवसेंदिवस पर्यावरणाचा हाेत चालेला ऱ्हास पाहता वृक्ष लागवड काळाची गरज आहे, असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. यावेळी विवेक गायकवाड, शुद्धाेधन गराडकर, प्रशांत शेंडे, सुषमा सहारे, सरिता रामटेके, ममता चक्रपाणी, इंदू पाटील, नीलम कौरती, श्वेता गाखरे, सुवर्णा सहारे, प्रिया लाड, काजल कठाणे, आँचल कठाणे, शीतल धवराळ, मुकेश सोनटक्के, गौरव पेठे, कुणाल ढोले, शुभम कुंभारे, तुषार तभाने, धनंजय उमप आदी उपस्थित हाेते.
....
जि.प. शाळा गरंडा
पारशिवनी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे पर्यावरण दिनानिमित्त शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच चक्रधर महाजन, शाळा समिती अध्यक्ष राष्ट्रपाल बोंबले, मुख्याध्यापिका नलिनी खडसे, पोलीस पाटील संदीप मेश्राम, शिक्षक खुशाल कापसे, अंगणवाडी सेविका संघमित्रा शेंडे, ग्रा.पं. कर्मचारी आनंद चव्हाण उपस्थित होते. गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गरंडा शाळेतर्फे परिसरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केले जात आहे. यावर्षी शाळा परिसरात चाफा व शाळेलगतच्या जिजाऊ शिवराई स्मृती परिसरात आंबा राेपट्याची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणासाठी राेपटी शिक्षक खुशाल कापसे यांनी उपलब्ध करून दिली.
....
काेंढाळी येथे वन अधिकाऱ्यांचा सत्कार
काेंढाळी : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी फरीद आझमी यांचा सत्कार करण्यात आला. काेंढाळी पर्यावरणप्रेमी मित्रमंडळ व पाेलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरात वृक्षाराेपण करण्यात आले. यावेळी ठाणेदार विश्वास पुल्लरवार, पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र साेनावले, ब्रिजेश तिवारी, नितीन ठवळे, प्रशांत खंते आदी उपस्थित होते. यावेळी ठाणेदार विश्वास पुल्लरवार यांच्या हस्ते फरीद आझमी यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रत्येकाने वृक्षांचे संगाेपन व संवर्धन करावे, असे आवाहन आझमी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाश गजबे यांनी केले. संचालन नितीन ठवळे यांनी तर आभार प्रशांत खंते यांनी मानले.
....
कामठीत भाजपतर्फे वृक्षाराेपण
कामठी : भारतीय जनता पक्षातर्फे कामठी येथे वृक्षारापेण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी हरिशंकर गुप्ता, ॲड. गोपाल शर्मा, संजय कनोजिया, लाला खंडेलवाल, उज्ज्वल रायबोले, नगरसेवक लालसिंग यादव, प्रतीक पडोळे, राज हडोती, मुकेश चकोले, अजय पांचोली, राजेश देशमुख आदी उपस्थित हाेते. नवीन कामठी येथील गाेरक्षण केंद्र परिसरात ५० राेपट्यांची लागवड करण्यात आली.
...
पाेलीस स्टेशन, जलालखेडा
जलालखेडा : स्थानिक पाेलीस स्टेशन परिसरात पर्यावरणदिनी वृक्षाराेपण करण्यात आले. कार्यक्रमात ३५ वर्षांपासून सेवा देणारे पाेलीस पाटील वामन काळमेघ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ठाणेदार हरिश्चंद्र गावडे यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षाची महत्त्वाची भूमिका आहे, त्यामुळे प्रत्येकाने दरवर्षी किमान एक वृक्ष लावण्याचा संकल्प केला पाहिजे, असे सांगितले. यावेळी माजी पोलीस पाटील वामन काळमेघ व विविध गावातील पाेलीस पाटील व पाेलीस कर्मचारी उपस्थित हाेते.
....
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती, महादुला
काेराडी : महादुला येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने वृक्ष लागवड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सेवानंद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी, पोलीस निरीक्षक क्रिष्णा शिंदे, संजय रामटेके उपस्थित होते. समितीतर्फे वृक्ष लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी प्रत्येक सदस्याकडे सोपविण्यात आली. यावेळी दयाल शाहू, राजू जरवार, निखिल खरवडे, आकाश रंगारी, राजू रामटेके, संदीप खोब्रागडे, आशिष जरवार, शुभम सोमवंशी, बबलू मस्करे, विक्की खोब्रागडे, सिद्धार्थ खोब्रागडे, सचिन चुटे, राकेश बोरकर, जयसिंग परिहार, शुभम गावंडे, विशाल वासनिक, संदीप मेश्राम, संतदास सारवा, प्रवीण मेश्राम, प्रदीप खोब्रागडे, कार्तिक बोरकर, हरीश सोमवंशी, कैलास टेंभरे, प्रदीप उके, गेंदलाल भाऊ, हर्ष परिहार, सुनील परिहार, गणेश शेंडे, सुनील खोब्रागडे, कपिल बल्लारे, ललित बावनकर व समितीचे सदस्य उपस्थित होते.