स्वच्छ गाव, निरोगी गावाचा संकल्प करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:10 AM2021-09-26T04:10:16+5:302021-09-26T04:10:16+5:30

कामठी: गाव स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक ग्रामस्थांची जबाबदारी आहे. गाव प्रदूषणमुक्त राहील तरच ग्रामस्थ निरोगी राहतील, असे प्रतिपादन कामठी ...

Resolve for a clean village, a healthy village | स्वच्छ गाव, निरोगी गावाचा संकल्प करा

स्वच्छ गाव, निरोगी गावाचा संकल्प करा

googlenewsNext

कामठी: गाव स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक ग्रामस्थांची जबाबदारी आहे. गाव प्रदूषणमुक्त राहील तरच ग्रामस्थ निरोगी राहतील, असे प्रतिपादन कामठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी केले. आजनी ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित ग्राम स्वच्छता अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी त्याला बोलत होत्या. विस्तार अधिकारी मनीष दिघाडे, एस. डाखोळे, एन.मोहाडीकर, सरपंच सुनील मेश्राम, उपसरपंच दिनेश बडगे, ग्रामपंचायत सदस्य विजय वानखेडे, अलका जीवतोडे, दर्शना देशमुख, सुशीला दवंडे, संगीता चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी श्रमदानातून गावात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. संचालन ग्रामविकास अधिकारी राहुल डोरले यांनी आभार छाया दातार यांनी मानले. श्रमदान कार्यक्रमात स्वाती करं, सोनू लुटे यांच्यासह जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक, गावातील डॉक्टर आदी सहभागी झाले होते.

Web Title: Resolve for a clean village, a healthy village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.