घरोघरी, मंदिरात गुंजला ‘जय जिनेंद्र’चा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:23 PM2018-03-29T23:23:41+5:302018-03-29T23:23:53+5:30

जैन धर्माचे २४ वे तीर्थकर भगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्त गुरुवारी जैन सेवा मंडळाच्यावतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्री दिगंबर जैन परवार मंदिर इतवारी येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. महावीरनगरातील महावीर उद्यानात शोभायात्रेचा समारोप झाला. चैत्र मास कृष्ण पक्ष त्रयोदशीला भगवान महावीरांचा जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त श्रीजी ची रथयात्रा मोठ्या उत्साहात श्री दिगंबर जैन परवान मंदिर येथून सकाळी ७.३० वाजता काढण्यात आली. यानिमित्त शहरातील सर्व जैन मंदिरात, घराघरात ‘जय जिनेंद्र’चा जयघोष करण्यात आला.

Resonance of 'Jai Jindendra' in the house and the temple | घरोघरी, मंदिरात गुंजला ‘जय जिनेंद्र’चा जयघोष

घरोघरी, मंदिरात गुंजला ‘जय जिनेंद्र’चा जयघोष

Next
ठळक मुद्देभगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त निघाली शोभायात्रा : जागोजागी झाले स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जैन धर्माचे २४ वे तीर्थकर भगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्त गुरुवारी जैन सेवा मंडळाच्यावतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्री दिगंबर जैन परवार मंदिर इतवारी येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. महावीरनगरातील महावीर उद्यानात शोभायात्रेचा समारोप झाला. चैत्र मास कृष्ण पक्ष त्रयोदशीला भगवान महावीरांचा जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त श्रीजी ची रथयात्रा मोठ्या उत्साहात श्री दिगंबर जैन परवान मंदिर येथून सकाळी ७.३० वाजता काढण्यात आली. यानिमित्त शहरातील सर्व जैन मंदिरात, घराघरात ‘जय जिनेंद्र’चा जयघोष करण्यात आला.
शोभायात्रेतील रथावर भगवान महावीर यांची प्रतिमा होती. चंद्रप्रभू मंदिर येथून श्री भगवान महावीर यांची मूर्ती विराजमान असलेला चांदीचा रथ होता. शोभायात्रेत मुनिश्री प्रणामसागर, प्रशमरती विजयजी म.सा. हे सुद्धा चालत होते. त्यांच्या मागे महिला व पुरुष भजन गात होते. शोभायात्रेत श्री कुंदकुंद दिगंबर जैन स्वाध्याय मंडळ ट्रस्ट नेहरू पुतळा येथील बालकांनी विशेष सादरीकरण केले. श्री परवारपुरा महिला मंडळाद्वारे दिव्यध्वनी वाद्याचे सादरीकरण संपूर्ण रथयात्रेत करण्यात आले. श्री नंदनवन दि. जैन बघेरवाल महिला मंडळाद्वारे विशेष नृत्य संपूर्ण शोभायात्रेदरम्यान सादर करण्यात आले. श्री दिगंबर जैन जागरण, पुलक जन महिला मंच, नागदा समाज, सैतवाल संघटन मंडळ, महावीरनगर द्वारे शोभयात्रेत आकर्षक चित्ररथ साकारण्यात आले होते.
शोभायात्रा महावीर उद्यानात पोहचल्यानंतर उज्वल पगारिया यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तुळशीनगर येथील सजय महिला मंडळाकडून मंगलाचरण करण्यात आले. प्रफुलभाई दोशी, श्रवण दोशी व अन्य अतिथींनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती, प्रमुख अतिथी खासदार कृपाल तुमाने, आमदार गिरीश व्यास, नगरसेविका शितल कांबळे, प्रशांत कांबळे, चंद्रकांत वेखंडे, जितेंद्र जैन लाला, सतेंद्र जैन मामू, लोकेश पाटोदी, पंकज बाबरिया, दिगंबर जैन तीर्थरक्षा कमिटीचे महामंत्री संतोष जैन पेंढारी राकेश पाटनी, पंकज बोहरा प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान आमदार गिरीश व्यास म्हणाले की, मुनिश्री डॉ. प्रणामसागर यांना ज्या अर्थनीती प्रबंधासाठी डीलिट उपाधी मिळाली आहे ही नीती भारतात लागू केल्यास देशाचा विकास होईल. या दरम्यान अजय संचेती म्हणाले की, समाजाप्रति माझे जे कर्तव्य आहे, त्याचे चांगल्या पद्धतीने पालन करण्याचा प्रयत्न करेल. नगरसेविका शितल कांबळे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष सतीश पेंढारी जैन, मंत्री पीयूषभाई शाह, उपाध्यक्ष शरद मचाले, डॉ. कमल पुगलिया, कोषाध्यक्ष विजय उदापूरकर, प्रचार प्रसार मंत्री हिराचंद मिश्रीकोटकर, उपमंत्री संजय टक्कामोरे, रवींद्र वोरा, महिला समितीच्या अध्यक्ष कश्मिरा पटवा, मंत्री सरिता ठोल्या, उपाध्यक्ष अमिता बरडिया, वंदना जैनी, कोषाध्यक्ष पिंकी पहाडिया, उपमंत्री शीला उदापूरकर, अनिता मोदी, महिपाल सेठी, हरीश जैन मौदावाले, रिंकू जैन, राजू सिंघवी, संजय जैन, विजय कोचर, योगेंद्र शहा, दिलीप पाटनी, मनिष छल्लानी, निर्मल कोठारी विपुल कोठारी, अनामिका मोदी, सरोज मिश्रीकोटकर, सुरेश आग्रेकर, दिलीप राखे, महेंद्र क टारिया, मगनभाई दोशी, रोहित शाह, सुभाष कोटेचा, प्रशांत सवाने, घनश्याम मेहता, देवेंद्र आग्रेकर, चैतन्य आग्रेकर, उदय जोहरापूरकर, कमल बज, सीमा डोणगांवकर यांचे सहकार्य लाभले.
भगवान महावीर जयंतीनिमित्त निघाली भव्य रथयात्रा
अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंचच्यावतीने भगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भव्य रथयात्रा काढण्यात आली होती. इतवारी शहीद चौक येथे रथयात्रेचे स्वागत नगरसेविका आभा पांडे व संजय महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. पं. बच्छराज व्यास चौकात आमदार गिरीश व्यास मित्र परिवाराकडून स्वागत करण्यात आले. किल्ला रोड, महाल येथे विजय भुसारी परिवाराने रथयात्रेचे स्वागत केले. अनेक संस्थांनी रथयात्रेच्या मार्गावर पुष्पवर्षा करून स्वागत केले. रथयात्रेनिमित्त विविध संस्थांनी विविध खाद्य पदार्थांचे वितरण केले. या रथयात्रेत दिनेश सावलकर यांच्या नेतृत्वात २४ आकर्षक रथ काढण्यात आले. यात पुलक जन चेतना मंच शाखा महावीर वॉर्ड यांची झाकी सहभागी झाली होती. रथयात्रेत पंचपरमेष्टी लोकसेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष सहयोग दिला.

Web Title: Resonance of 'Jai Jindendra' in the house and the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.