उपराजधानीत झाला महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 10:14 AM2019-03-09T10:14:38+5:302019-03-09T10:15:03+5:30
जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने उपराजधानीत विविध संघटना, संस्था, शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करून महिलेच्या अस्तित्वाचा सन्मान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने उपराजधानीत विविध संघटना, संस्था, शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करून महिलेच्या अस्तित्वाचा सन्मान करण्यात आला. समाजात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचे, त्यांच्या गुणांचे कौतुक करण्यात आले.
जिजाऊ लेक पुरस्काराने जि.प.अध्यक्षांचा सन्मान
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना (प्राथमिक) द्वारे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांना जिजाऊची लेक हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर १३ तालुक्यातील तेरा महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर प्रिया तेलकुंठे, प्रमिला जाखलेकर यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी टिकारामजी कडुकर, युवराज उमरेडकर, दिलीप लंगडे, तुषार अंजनकर, संतोष माळवे, रमेश गंधारे, शशिकांत पाटील, नीळकंठ माने, मनीष पोरटे, राजू वानखेडे, संजय डाखोले, भाऊराव मडावी, रामू डहाके, राजेश महुरकर, संजय नागरे, पुरुषोत्तम चिमोटे, रमेश सोनवणे आदी उपस्थित होते.
विश्वास माध्यमिक विद्यालय
विश्वास एज्युकेशन सोसायटी व गिरीश गांधी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संस्थेच्या नवीन इमारतीच्या सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व सचिव श्रीराम काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष अलका काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रिया काळे, वक्ते म्हणून रेखा दंडिगे, सुरेखा जिचकार यांच्यासह व्यासपीठावर मुख्याध्यापिका स्मिता पाटील, अरुण ठाकरे, प्राचार्य मंगला महाजन उपस्थित होत्या. संचालन पुष्पा भेंडे यांनी तर आभार भारती दवणे यांनी मानले.
.स्वातंत्र्यवीर सावरकर विद्या भवन
श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित स्वातंत्र्यवीर सावरकर विद्या भवन येथे आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या विश्वस्त आरती जोशी यांच्या हस्ते झाले. मुख्यध्यापिका आशा दीक्षित, प्राचार्य डॉ. जयश्री खवासे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संचालन कविता बाहेकर यांनी केले तर आभार विद्या समदूरकर यांनी मानले.
जीकुमार आरोग्यधाममध्ये महिला दिन साजरा
जागतिक महिला दिनानिमित्त जीकुमार आरोग्य धाम येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्याल, जरीपटका केंद्राच्या नीलिमा दीदी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपाच्या महिला व बाल कल्याण सभापती प्रगती पाटील उपस्थित होत्या. प्रास्ताविक डॉ. अंजू ममतानी यांनी केले. यावेळी उषा किरण शर्मा, उर्मिला तिवारी, मालती खोब्रागडे, ज्योती ढोलवानी, शोभा भागिया यांचा सत्कार करण्यात आला. आभार डॉ. जी.एम. ममतानी यांनी केले. यावेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महावितरण
जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम महावितरण कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमास नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी संचालक दिलीप घुगल, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, स्वाती प्रसाद रेशमे, अर्चना दिलीप घुगल, महावितरणच्या ग्राहक सल्लागार गौरी चंद्रायण उपस्थित होत्या. यावेळी समुपदेशक स्नेहा दामले यांनी कौटुंबिक मानसिक स्वास्थ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा नारेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवार, प्रज्वला किरनाके, उमा राव, लीना पाटील, मनीषा देशमुख, मनीषा भिवगडे, नेहा हेमने यांचे सहकार्य लाभले.