‘माझा विठ्ठल’ चित्र प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:48 AM2017-10-30T00:48:24+5:302017-10-30T00:48:53+5:30
विद्यार्थ्यांनी कॅनव्हासवर साकारलेल्या विठुमाऊली च्या विविध रुपांचे दर्शन लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत चित्र रसिकांनी अनुभवले. निमित्त होते
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थ्यांनी कॅनव्हासवर साकारलेल्या विठुमाऊली च्या विविध रुपांचे दर्शन लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत चित्र रसिकांनी अनुभवले. निमित्त होते स्टार प्रवाह व लोकमतद्वारे आयोजित ‘माझा विठ्ठल ’ चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या निवडक चित्रांचे प्रदर्शन येथे आयोजित करण्यात आले होते.
प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मराठी अभिनेते व निर्देशक आदिनाथ कोठारे हे स्वत: उपस्थित होते. या दरम्यान स्वामी अवधेशानंद विद्यालयाच्या प्राचार्य निलजा उमेकर व सेंट पॉल स्कूलचे संचालक राजाभाऊ टांकसाळे, पोद्दार वर्ल्ड स्कूलचे प्राचार्य गणेश ठवरे प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते फित कापण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलावर ‘विठुमाऊली’ ही मालिका स्टार प्रवाहवर येत्या ३० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. ही मालिका महेश कोठारे, आदिनाथ कोठारे व कोठारे व्हीजन संस्थेद्वारा निर्मित करण्यात आली आहे.
या मालिकेच्या माध्यमातून ‘माझा विठ्ठल’ ही अनोखी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून विठ्ठलाचे विविध रुप कॅनव्हासवर साकारले.
विद्यार्थ्यांनी साकारलेल्या निवडक चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक व चित्रप्रेमींनी उपस्थिती दर्शविली होती. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांचे रसिकांनी भरभरून कौतुक केले. माझा विठ्ठल या स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा ३० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर प्रदर्शित होणाºया ‘विठुमाऊली’ च्या पहिल्याच भागात होणार आहे.
उपस्थितांशी साधला संवाद
अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विठ्ठलाची विविध रुपांची भरभरून प्रशंसा केली. त्याचबरोबर उपस्थितांनी केलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली. ते म्हणाले की विठुमाऊली हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. लाखो लोकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. विठुमाऊलीने सर्व मानव जाती कल्याणाचा मार्ग दाखविला आहे. विठुमाऊलीच्या लीला महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी या मालिक ा तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांकडून या मालिकेला भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.