मांगली येथे लसीकरणाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:08 AM2021-05-26T04:08:15+5:302021-05-26T04:08:15+5:30
उमरेड : तालुक्यातील गट ग्रामपंचायत, मांगली येथे ४५ वर्षांवरील वयाेगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले असून, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ...
उमरेड : तालुक्यातील गट ग्रामपंचायत, मांगली येथे ४५ वर्षांवरील वयाेगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले असून, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नियोजन आणि जनजागृतीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी मांगली व खापरी येथे घरोघरी भेट देत लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले. आधी गृहभेट घेत एकूण ९४ जणांची नोंदणी केली. माहिती संकलित केली. लसीकरण करण्याचे आवाहन केले. आधी नोंदणी केल्यानंतर त्यापैकी ७८ जणांनी लसीकरण करून घेतले. लसीकरणाबाबत गैरसमज आणि भीती दूर करीत आरोग्य चमूने पूर्वनाेंदणीचा यशस्वी प्रयोग केला. ग्रामपंचायतीचे पालक अधिकारी डॉ. प्रमोद सपाटे यांच्या नेतृत्त्वात सरपंच शंकर कुरडकर, उपसरपंच छोटू मोटघरे, ग्रामसेवक बाळाजी देशमुख, डॉ. चंद्रसुरेश डोंगरवार, डॉ. कमलेश रावते, ऋषिकेश पाऊनकर, ललिता कुळमते, मंजुषा टोंगे, नत्थाबाई वाढई, उमाकांत मोटघरे, माया कुरडकर, पुष्पा सहारे आदींनी ही मोहीम राबविली.