रेस्टॉरंट गर्दीने फुलले
By admin | Published: January 1, 2016 04:18 AM2016-01-01T04:18:35+5:302016-01-01T04:18:35+5:30
नववर्षानिमित्त अनेकजण बाहेर हॉटेलिंग करण्याचा बेत आखतात. कुटुंबासह अनेक नागरिक रात्री नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बाहेर
नववर्षानिमित्त अनेकजण बाहेर हॉटेलिंग करण्याचा बेत आखतात. कुटुंबासह अनेक नागरिक रात्री नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बाहेर पडले. शहरातील अनेक भागातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॉफी हाऊस गर्दीने फुलल्याचे चित्र होते. काही हॉटेल्स अन् रेस्टॉरंटच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी पार्किंग करण्यासाठी सुद्धा जागा नसल्याची स्थिती होती. धरमपेठ, गोकुळपेठ परिसरातील रेस्टॉरंटमध्ये नागरिकांची अधिक गर्दी पाहावयास मिळाली. नववर्षाचे औचित्य साधून अनेक हॉटेल्सचालकांनी ग्राहकांसाठी पॅकेज उपलब्ध करून दिले होते. रात्री उशिरापर्यंत नागरिक आपल्या कुटुंबीयांसमवेत रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसले. तर चौकाचौकात असलेल्या पाणीपुरी आणि चायनीजच्या ठेल्यांवरही नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसले.
पोलीस अधिकारी रस्त्यावर
सहपोलीस आयुक्त राजवर्धन, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे यांच्यासह शहर पोलीस दलातील जवळपास सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्री १०.४५ ला उपराजधानीच्या रस्त्यावर होते. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव हे सुद्धा ‘थर्टी फर्स्ट‘च्या बंदोबस्ताची मिनिट टू मिनिट माहिती घेत होते.
२२५ तळीरामांवर कारवाई
वाहतूक पोलीस सायंकाळी ६ नंतर अचानक आक्रमक झाले. त्यांनी दारुड्या वाहनचालकांवर कारवाईचा सपाटा लावला. स्वत: वाहतूक शाखेचे उपायुक्त भारत तांगडे ठिकठिकाणी विविध सिग्नलवर भेट देऊन वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त तपासत होते. रात्री १०.३० पर्यंत १८५ तळीराम ठाण्यात (कागदोपत्री) जमा झाले होते, तर रात्री ११ वाजता ड्रंकन ड्राईव्हच्या कारवाईचा आकडा २२५ वर पोहचला होता.