रेस्टेलस लेग सिंड्रोम डे; वेळीच लक्ष द्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 09:06 AM2020-09-23T09:06:52+5:302020-09-23T09:07:18+5:30

शरीराला व मेंदूला पुरेशी झोप न मिळाल्याने ही व्यक्ती नकळत पाय हलवू लागते व पुढे ती सवय बनते. तसे केल्याने त्या व्यक्तीला चांगले वाटते. कारण त्यामुळे डोपामाईन नावाचे हार्मोन त्याच्यात स्रवत असते.

Restellus Leg Syndrome Day; Pay attention in time .. | रेस्टेलस लेग सिंड्रोम डे; वेळीच लक्ष द्या..

रेस्टेलस लेग सिंड्रोम डे; वेळीच लक्ष द्या..

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कित्येकदा आपल्यासमोर बसलेली व्यक्ती सतत पाय हलवत रहात असेल तर आपण अस्वस्थ होतो. ती ओळखीची असेल तर आपण पाय स्थिर ठेवण्याबाबत सांगू शकतो अन्यथा दुर्लक्ष करणे एवढेच हातात उरते. बरेचदा एखादी व्यक्ती झोपेतच खूप पाय हलवत असते असंही आपण पाहतो.
पण कां बरं जडते अशी सवय एखाद्याला? काय कारणं असतात.. तसे केल्याने त्या व्यक्तीच्या मेंदूत नेमके काय घडत असते.. आणि ही सवय सुटण्यासाठी त्याने काय करावं..
आज हे सर्व आठवण्याचे कारण, आज आहे, जागतिक सतत पाय हलवत राहण्याच्या सवयीचा दिवस. रेस्टेलस लेग सिंड्रोम डे.

रेस्टलेस लेग सिंड्रोम हा एक मेंदूशी निगडित आजार असल्याचे वैद्यकशास्त्र सांगते. हॉर्वर्ड मेडिकल स्कूल, बोस्टनमधील प्रो. डॉ. डब्ल्यू क्विंकमैन यांच्या मते, अशा व्यक्तीची झोप कमी असते. शरीराला व मेंदूला पुरेशी झोप न मिळाल्याने ही व्यक्ती नकळत पाय हलवू लागते व पुढे ती सवय बनते. तसे केल्याने त्या व्यक्तीला चांगले वाटते. कारण त्यामुळे डोपामाईन नावाचे हार्मोन त्याच्यात स्रवत असते.

स्विडनमधील न्यूरॉलॉजीचे प्राध्यापक कार्ल एक्सेल एकबोर्न यांनी १९४५ मध्ये सर्वात प्रथम हा सिंड्रोम स्पष्ट करून दाखवला. त्यानंतर याबाबत बरेच संशोधन झाले. मात्र त्यामागचे निश्चित कारण अद्याप समोर यायचे आहे. जगातील लोकसंख्येच्या सात टक्के लोकसंख्या या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळेच २३ सप्टेंबर हा दिवस रेस्टलेस सिंड्रोम डे म्हणून पाळला जातो.

पाय हलवत राहण्यामागे, वजन अधिक असणे, पुरेशी झोप न घेणे, व्यायाम न करणे, दारू व सिगरेटचे अत्याधिक सेवन आदी कारणे आहेत. तसेच शरीरात लोहची कमतरता असणे हेही एक कारण सांगितले जाते. संशोधकांच्या मते, सतत पाय हलवत राहण्याच्या सवयीमुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो.

त्यावर उपचार केला जाऊ शकतो. काही औषधे, पुरेशी झोप, व्यायाम आदी उपचार आहेत.

 

Web Title: Restellus Leg Syndrome Day; Pay attention in time ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य