कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 09:49 PM2019-12-16T21:49:42+5:302019-12-16T21:50:24+5:30

कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा, या मुख्य मागणीला घेऊन विदर्भ कोतवाल संघाच्या मोर्चाने विधिमंडळावर पहिल्याच दिवशी धडक दिली.

Restore the fourth category to Kotwala | कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा

कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा

Next
ठळक मुद्देविदर्भ कोतवाल संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा, या मुख्य मागणीला घेऊन विदर्भ कोतवाल संघाच्या मोर्चाने विधिमंडळावर पहिल्याच दिवशी धडक दिली. विदर्भातून सहभागी झालेल्या या मोर्चेकरांचे एक शिष्टमंडळ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटले. त्यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. परंतु मोर्चेकरांनी लेखी आश्वासन दिल्यावरच जागा सोडणार, असा निर्धार केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आमदार विनोद अग्रवाल यांनी मोर्चाला भेट दिली. मागण्यांसाठी लवकरच बैठक लावली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतरच मोर्चा माघारी परतला.
राज्यात १० हजारावर कोतवाल आहेत. पाच हजार रुपये मानधन आणि १० रुपये चप्पल भत्ता मिळतो. एवढ्या पैशांमध्ये जगायचे कसे, हा प्रश्न आहे. गेल्या ६९ वर्षांपासून शासनदरबारी कोतवाल न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, परंतु कुणीच लक्ष देत नसल्याची खंत विदर्भ कोतवाल संघचे रवींद्र बोदेले यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, कोतवाल हा क्षेत्रीयस्तरावर गावातील तसेच शहरातील महसूल यंत्रणेचा प्रमुख घटक आहे. शासन आणि जनतेतील अतिशय जवळचा विश्वासू कर्मचारी आहे. ते शासनाची २४ तास सेवा करतात. ते चतुर्थ श्रेणीस पात्र आहेत. यामुळे शासनाने सकारात्मकपणे या मागणीकडे पाहावे, असेही ते म्हणाले.

नेतृत्व
मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष रवींद्र बोदेले, कार्याध्यक्ष मंगेश जांभुळकर, सरचिटणीस दीपक रेवतकर, कविता ठवरे आदींनी केले.

मागण्या
कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा.
कोतवालातून तलाठी व तत्सम पदासाठी २५ टक्के पदोन्नती द्या.
सेवानिवृत्त कोतवालांना पेन्शन व वारसांना सेवेत संधी द्या.
समान काम, समान वेतन या निर्णयाची अंमलबजावणी करा.

Web Title: Restore the fourth category to Kotwala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.