काेच्छी बॅरेजमध्ये जाण्यास प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:07 AM2021-06-26T04:07:34+5:302021-06-26T04:07:34+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : काेच्छी (ता. सावनेर) गावाजवळ कन्हान नदीवर काेच्छी बॅरेजच्या निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : काेच्छी (ता. सावनेर) गावाजवळ कन्हान नदीवर काेच्छी बॅरेजच्या निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या बॅरेजमध्ये पाेहताना निखिल तुमसरे (२३, रा. सावनेर) या तरुणाचा रविवारी (दि. २०) मृत्यू झाला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत जलसंपदा विभागाच्या कन्हान नदी प्रकल्प (काेच्छी बॅरेज)ने काेणत्याही कारणासाठी उतरण्यास प्रतिबंध केला असून, तसे सूचना फलक लावले आहेत.
पावसाळा सुरू झाल्याने कन्हान नदीतील पाण्याची पातळी वाढत आहे. हा प्रकल्प सध्या निर्माणाधीन आहे. प्रकल्पस्थळी नदीचे पात्र अरुंद व खाेल झाले आहे. बांधकामामुळे नदीच्या पात्रात खाेल खड्डे तयार झाले आहेत. त्यात पाणी साचले असून, काठावरील मातीचा थर खचलेला आहे. त्यामुळे कुणीही या बॅरेजमध्ये मासेमारी करण्यासाठी व पाेहण्यासाठी उतरू नये. पर्यटक व गावकऱ्यांनी या ठिकाणी पाेहणे, सेल्फी काढणे, नाैकायान करणे, रबरी ट्यूब टाकून पाेहणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
या आदेशाने उल्लंघन केल्यास संबंधितांवर फाैजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही जलसंपदा विभागाच्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या कन्हान नदी प्रकल्प (काेच्छी) बॅरेज व्यवस्थापनाने दिला असून, तसे सूचना फलक बॅरेज परिसरात लावण्यात आले आहेत. सध्या नदीत भरपूर पाणी असून, शेवाळामुळे काठावरील दगड गुळगुळीत झाले आहे. त्यावर पाय ठेवल्यास घसरून बॅरेजमध्ये पडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी सावधगिरी व सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे, असेही जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
...
बॅरेजच्या बांधकामस्थळी पाण्याची खाेली खूप जास्त आहे. या ठिकाणी हाेणारी जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययाेजना म्हणून या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या सुरक्षेसाठी आदेशाचे काटेकाेर पालन करावे.
- अनिता पराते, कार्यकारी अभियंता,
कन्हान नदी प्रकल्प (काेच्छी) बॅरेज.
===Photopath===
250621\1746-img-20210625-wa0024.jpg
===Caption===
कन्हान नदी येथे पयँटकांना येण्यास प्रतिबंध