नागपुरात १० दिवसात ग्रीन बस पुन्हा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:17 AM2019-02-05T00:17:56+5:302019-02-05T00:18:59+5:30
अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली ग्रीन बस सेवा गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद आहे. यासाठी गडकरी यांनी नवी दिल्ली येथे स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीचे प्रतिनिधी, महापालिकेतील अधिकारी यांची बैठक घेऊ न ग्रीन बसवर तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतरही ही बससेवा सुरू झाली नाही. २८ ग्रीन बसेस डेपोत धूळ खात उभ्या आहेत. दरम्यान, सोमवारी नितीन गडकरी यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना ग्रीन बस सेवा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली ग्रीन बस सेवा गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद आहे. यासाठी गडकरी यांनी नवी दिल्ली येथे स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीचे प्रतिनिधी, महापालिकेतील अधिकारी यांची बैठक घेऊ न ग्रीन बसवर तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतरही ही बससेवा सुरू झाली नाही. २८ ग्रीन बसेस डेपोत धूळ खात उभ्या आहेत. दरम्यान, सोमवारी नितीन गडकरी यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना ग्रीन बस सेवा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.
स्कॅनिया कंपनीने थकीत बिल, सुसज्ज डेपोच्या मुद्यावरून १२ ऑगस्टपासून ग्रीन बस सेवा बंद केली होती. सोमवारी नितीन गडकरी यांनी दिल्लीत पुन्हा स्कॅनिया कंपनीचे अधिकारी, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, परिवहन सभापती बंटी कुकडे व परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांना ग्रीन बस सुरू करण्याचे निर्देश दिले.
बंटी कुकडे यांनी याला दुजोरा दिला असून, गडकरी यांनी १० दिवसात ग्रीन बस सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी योग्य कार्यवाही करण्यास आयुक्तांना निर्देश दिल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे रेड बस ऑपरेटर ट्रॅव्हल टाइमने २८ बसेस ताब्यात घेऊन चालविण्याची तयारी दर्शविली आहे. प्रत्येक बससाठी १.२८ कोटी देण्याची तयारी आहे. सध्या ग्रीन बसेस हिंगणा एमआयडीसी डेपोत उभ्या आहेत.