सेवानिवृत्त न्या. गुलाबराव पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:08 AM2021-05-10T04:08:37+5:302021-05-10T04:08:37+5:30

गुलाबराव पाटील यांचा जन्म १८ मार्च १९४१ रोजी आर्णी तालुक्यातील लोणी या छोट्या गावात झाला. त्यांनी जन्मगावी प्राथमिक व ...

Retired Justice. Gulabrao Patil passed away | सेवानिवृत्त न्या. गुलाबराव पाटील यांचे निधन

सेवानिवृत्त न्या. गुलाबराव पाटील यांचे निधन

Next

गुलाबराव पाटील यांचा जन्म १८ मार्च १९४१ रोजी आर्णी तालुक्यातील लोणी या छोट्या गावात झाला. त्यांनी जन्मगावी प्राथमिक व माध्यमिक, तर यवतमाळ, अमरावती व नागपूर येथे उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी १९६८ मध्ये विधी पदवी मिळवल्यानंतर त्या वेळचे प्रसिद्ध वकील सी.एस. धर्माधिकारी (दिवंगत सेवानिवृत्त न्यायमूर्ती) यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली व्यवसायाला सुरुवात केली. दरम्यान, १९७८ व १९८६ मध्ये त्यांची सहायक सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ३० मे १९९० रोजी त्यांची अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. दोन वर्षांनी ते न्यायमूर्तीपदी कायम झाले. दरम्यान, त्यांनी काही काळ प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही कार्य केले. २००३मध्ये ते सेवानिवृत्त झाले. न्यायव्यवस्थेतील त्यांची कारकीर्द नावलौकिक वाढवणारी ठरली. पुढे त्यांनी २७ जानेवारी २००४ ते २६ जानेवारी २००९ या पाच वर्षांच्या काळात लोकायुक्त म्हणून कार्यकौशल्याचा ठसा उमटवला. त्यांच्या पश्चात दोन मुले धनंजय व मकरंद, तीन विवाहित मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे विधि क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Web Title: Retired Justice. Gulabrao Patil passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.