सेवानिवृत्त न्यायमूर्ती गुलाबराव पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:08 AM2021-05-10T04:08:17+5:302021-05-10T04:08:17+5:30
गुलाबराव पाटील यांनी १९६८ मध्ये विधी पदवी मिळवल्यानंतर त्यावेळचे प्रसिद्ध वकील सी़ एस़ धर्माधिकारी (दिवंगत सेवानिवृत्त न्यायमूर्ती) यांच्या मार्गदर्शनाखाली ...
गुलाबराव पाटील यांनी १९६८ मध्ये विधी पदवी मिळवल्यानंतर त्यावेळचे प्रसिद्ध वकील सी़ एस़ धर्माधिकारी (दिवंगत सेवानिवृत्त न्यायमूर्ती) यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली व्यवसायाला सुरुवात केली़ दरम्यान, १९७८ व १९८६ मध्ये त्यांची सहायक सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली़ त्यानंतर ३० मे १९९० रोजी त्यांची अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली़ दोन वर्षांनी ते न्यायमूर्तीपदी कायम झाले़ दरम्यान, त्यांनी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही कार्य केले़ २००३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले़ त्यांच्या पश्चात दोन मुले धनंजय व मकरंद, दोन विवाहित मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे़ त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या निधनामुळे विधी क्षेत्रात शोककळा पसरली आहे़