निवृत्त पोलीस अधिकारी महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:14 AM2018-07-19T00:14:10+5:302018-07-19T00:15:16+5:30
निवृत्त पोलीस अधिकारी महिलेला त्यांची मोबाईलवर माहिती विचारली आणि एका आरोपीने त्यांना ७१ हजारांचा गंडा घातला. सुहासिनी सूर्यभान मेश्राम (वय ६४) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या पोलीस खात्यातून उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवृत्त पोलीस अधिकारी महिलेला त्यांची मोबाईलवर माहिती विचारली आणि एका आरोपीने त्यांना ७१ हजारांचा गंडा घातला. सुहासिनी सूर्यभान मेश्राम (वय ६४) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या पोलीस खात्यातून उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाल्या आहेत.
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणी दुर्गावती चौकात मयूर पॅलेसमध्ये सुहासिनी मेश्राम राहतात. त्यांनी एका इलेक्ट्रॉनिक शॉपमधून काही दिवसांपूर्वी बजाज फायनान्सच्या माध्यमातून वॉशिंग मशीन विकत घेतली होती. ठरल्याप्रमाणे आठ हप्त्यात त्यांनी कर्ज फेडले. २० मार्चला दुपारी २ वाजता त्यांना एक फोन आला. वॉशिंग मशीन कर्ज प्रकरणात तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेल्या तीन ओटीपीचे क्रमांक सांगा, असे म्हणत आारोपीने त्यांच्याकडून माहिती काढून घेतली. त्याआधारे मेश्राम यांच्या बजाज फायनान्सच्या खात्यातून आॅनलाईन ७१,११९ रुपयांची आॅनलाईन खरेदी केली. ही रक्कम वसूल करण्यासाठी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मेश्राम यांच्यामागे तगादा लावल्यानंतर हा गैरप्रकार उघडकीस आला. मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.