सेवानिवृत्त पोलिसांनाही मिळणार पॉलिक्लिनिकचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:28 AM2017-11-05T00:28:40+5:302017-11-05T00:28:52+5:30
शहर पोलीस मुख्यालयात नवनिर्मित अत्याधुनिक व सुविधायुक्त पॉलिक्लिनीकमध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचाºयांना सुद्धा उपचाराचा लाभ मिळेल. यासोबतच पोलीस कर्मचाºयांचा आहार भत्ता वाढवून दिला जाईल,....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलीस मुख्यालयात नवनिर्मित अत्याधुनिक व सुविधायुक्त पॉलिक्लिनीकमध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचाºयांना सुद्धा उपचाराचा लाभ मिळेल. यासोबतच पोलीस कर्मचाºयांचा आहार भत्ता वाढवून दिला जाईल, अशी घोषणा राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी येथे केली.
काटोल रोडवरील पोलीस मुख्यालयातील नवनिर्मित पॉलिक्लिनिकचे उद्घाटन शनिवारी माथूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी त्यांना योग्य उपचारासाठी अत्याधुनिक रुग्णालयाची गरज होती. नागपूर शहर पोलीस विभागाने ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. नागपुरात चांगल्या सुविधा उपलब्ध असतानाही अधिकारी बदलीसाठी अर्ज करतात. येत्या काही दिवसात जे पोलीस सेवानिवृत्त होतील किंवा अनेक वर्षांनंतर पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी अधिकाºयांना सुद्धा या अत्याधुनिक रुग्णालयाचा लाभ मिळायला हवा. पोलीस मुख्यालयात १९७२ मध्ये साकारण्यात आलेल्या पोलीस रुग्णालयाचे अत्याधुनिक पॉलिक्लिनिकमध्ये रुपांतर होणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले इंडियन आॅईलचे कार्यकारी संचालक मुरली श्रीवास यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळेच नागरिक सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठीच पॉलिक्लिनिकच्या आधुनिकीकरणासाठी मदत केली.
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे,डीसीपी संभाजी कदम, स्मार्तना पाटील, राकेश कलासागर, सुहास बोवचे, एस. चैतन्य, एसीपी सोमनाथ वाघचौरे, रिना जनबंधू आदींसह अनेक अधिकारी उपस्थित होते.
असोसिएशनने मानले आभार
शहर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाºयांना या क्लिनिकचा लाभ मिळण्याचे समर्थन केले. यावर डीजी माथूर यांनी सहमती दर्शवित याची घोषणा केली. याबाबत महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कल्याणकारी असोसिएशनचे नागपूरचे अध्यक्ष रमेश मेहता, सचिव सुरेश महाले यांंच्यासह कार्यकारी सदस्यांनी निर्णयाचे स्वागत करीत डीजी व पोलीस आयुक्तांबद्दल आभार व्यक्त केले.