ट्रिपल आयटीत शिकविणार आयआयटीचे निवृत्त प्राध्यापक
By Admin | Published: June 28, 2016 02:43 AM2016-06-28T02:43:30+5:302016-06-28T02:43:30+5:30
महाराष्ट्रातील पहिल्या ‘ट्रिपल आयटी’त (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) प्रत्यक्ष वर्गांची सुरुवात आॅगस्ट
आॅगस्टपासून सुरू होणार राज्यातील पहिले ‘ट्रिपल आयटी’ : प्रवेशासाठी नोंदणीस सुरुवात
योगेश पांडे ल्ल नागपूर
महाराष्ट्रातील पहिल्या ‘ट्रिपल आयटी’त (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) प्रत्यक्ष वर्गांची सुरुवात आॅगस्ट महिन्यापासून होणार आहे. येथे ४० टक्के शिक्षक हे प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ किंवा ‘आयआयटी’तील निवृत्त प्राध्यापक राहणार आहेत. तर उर्वरित ६० टक्के प्राध्यापक हे मार्गदर्शक संस्था असणाऱ्या ‘व्हीएनआयटी’तील असतील. ‘ट्रिपल आयटी’त प्रवेशासाठी नोंदणीस मागील आठवड्यापासूनच सुरुवात झाली आहे. पहिल्या वर्षी येथे दोन अभ्यासक्रम राहणार असून एकूण ८० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संस्थेमध्ये संशोधनावर जास्तीत जास्त भर देण्यात येणार आहे.
‘ट्रिपल आयटी’नंतर बऱ्याच उशिरा ‘आयआयएम’ची (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट) घोषणा झाली. परंतु ‘आयआयएम’चे वर्ग मागील वर्षी सुरूदेखील झाले. त्यामुळे ‘ट्रिपल आयटी’चे वर्ग कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने ‘ट्रिपल आयटी’च्या तात्पुरत्या जागेला मान्यता दिली व त्यानंतर प्रवेशासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली. ‘आरटीटीसी’ (रिजनल टेलिकॉम ट्रेनिंग सेंटर) येथे संस्थेचे वर्ग होणार आहेत.
‘ट्रिपल आयटी’त पहिल्या वर्षात ‘बीटेक’ अभ्यासक्रमाच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन’ आणि ‘कॉम्प्युटर इंजिनिअरिंग’ या दोन शाखा सुरू होतील व प्रवेशक्षमता प्रतिशाखा ४० असणार आहे. ‘ट्रिपल आयटी’मध्ये केंद्र शासनाच्या ‘जोसा’तर्फे (जॉईन्ट सीट अलॉकेशन आॅथोरिटी) ‘सीएसएबी’च्या (सेंट्रल सीट अलॉकेशन बोर्ड) माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहेत. यासाठी नोंदणीस २४ जूनपासून सुरुवात झाली आहे.
‘ट्रिपल आयटी’त शिक्षणाचा दर्जा सुरुवातीपासूनच उत्तम राखण्यावर भर राहणार आहे. यंदा हे पहिलेच वर्ष असल्याने कायमस्वरुपी प्राध्यापकांची नियुक्ती झालेली नाही. परंतु कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात येणार आहे. ‘व्हीएनआयटी’तील प्राध्यापकदेखील शिकविणार आहेत. याशिवाय ‘आयआयटी’ती निवृत्त प्राध्यापकदेखील शिकविण्यासाठी येतील, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक व ‘ट्रिपल आयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य सचिव गुलाबराव ठाकरे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना ‘इंडस्ट्री इंटर्नशिप’ अनिवार्य
४‘ट्रिपल आयटी’च्या माध्यमातून विद्यार्थी संशोधन व उद्योग जगताशी जुळले जावे असा प्रयत्न राहणार आहे. त्यानुसार अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना विविध प्रकल्प देण्यात येणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना ‘इंडस्ट्री इंटर्नशीप’ अनिवार्य राहणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना एका पूर्ण सत्रात प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रात जाऊन प्रकल्प पूर्ण करावा लागणार आहे.
संकेतस्थळ झाले सुरू
४नागपूरच्या ‘ट्रिपल आयटी’बाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी विशेष संकेतस्थळदेखील सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रिया तसेच संस्थेबाबत इत्थंंभूत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.