निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची पेन्शनसाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2023 10:30 PM2023-03-25T22:30:55+5:302023-03-25T22:33:50+5:30

Nagpur News एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता पेंशनसाठी चकरा माराव्या लागत आहे.

Retired ST employees roaming for pension | निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची पेन्शनसाठी वणवण

निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची पेन्शनसाठी वणवण

googlenewsNext

 
नागपूर : एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता पेंशनसाठी चकरा माराव्या लागत आहे. कागदपत्रांमधील किरकोळ चुकांमुळे अनेकांना महामंडळाचे अधिकारी ईपीएफओ कार्यालयात पाठवत आहेत तर तेथील अधिकारी एसटी महामंडळाच्या कार्यालयात परत पाठवत आहे. अशा प्रकारची अनेक उदाहरणे पुढे येत असून या एकूणच प्रकारामुळे संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप होत आहे.

वाहक म्हणून सेवा देणारे एक कर्मचारी एसटीतून डिसेंबर २०२२ मध्ये निवृत्त झाले. त्यामुळे त्यांनी पेंशनसाठी संबंधित कागदपत्रांसह ईपीएफओ कार्यालयात निवेदन दिले. तेथून त्रुटी आल्याने आतापर्यंत तीन वेळा एसटी महामंडळाकडून त्यात सुधारणा करून पाठविण्यात आली. मात्र, त्यांना अद्याप पेंशन सुरू झालेली नाही. या संबंधाने निवृत्त कर्मचाऱ्याने एसटीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते म्हणतात की सुमारे २० कर्मचाऱ्यांची पेंशन पीएफओ कार्यालयातून रोखण्यात आली आहे. तर, पीएफओचे अधिकारी यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांच्या चुकीकडे बोट दाखवत आहेत.


अनेकांचे आधार लिंक नाही

संबंधित अधिकाऱ्याची माहिती अशी आहे की निवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे आधार कार्ड लिंक नाही. त्यांनी ईपीएफओ कार्यालयात जाऊन ५ आणि १० नंबरचा फॉर्म भरायला हवा. यासोबत त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि कोणत्या कारणामुळे आधार लिंक झाले नाही, त्याचा स्क्रीन शॉट घेऊन तो जमा करायला हवा. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याची पेंशन सुरू करण्याचे काम पीएफओचे आहे.
 

पेंशन वाढविण्यासाठीही परिश्रम
२०१८ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पेंशन सुरू आहे. मात्र, ती वाढविण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना आधार कार्ड लिंक करने आवश्यक आहे. सोबत आणखी काही प्रक्रिया आहे. नियम आणि अटींच्या जाळ्यात कर्मचारी अडकले असून त्यामुळे त्यांना जास्त त्रास होत असल्याचे एसटी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी म्हटले आहे.

Web Title: Retired ST employees roaming for pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.