सेवाकाळातील अंतिम वेतनाच्या ५० टक्के निवृत्तिवेतन मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:09 AM2021-09-27T04:09:28+5:302021-09-27T04:09:28+5:30

वरिष्ठ नागरिक परिसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दीनदयाळ उपाध्याय सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष राजाभाऊ जगताप होते. महिला प्रदेश ...

Retirement pension should be 50% of the last salary | सेवाकाळातील अंतिम वेतनाच्या ५० टक्के निवृत्तिवेतन मिळावे

सेवाकाळातील अंतिम वेतनाच्या ५० टक्के निवृत्तिवेतन मिळावे

googlenewsNext

वरिष्ठ नागरिक परिसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दीनदयाळ उपाध्याय सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष राजाभाऊ जगताप होते. महिला प्रदेश अध्यक्ष शिल्पा देशपांडे, माजी महामंत्री प्रकाश सोहनी, प्रदेश महामंत्री सुधीर डबीर, कोषाध्यक्ष चंद्रकांत देशपांडे मंचावर होते. पिंपळापुरे पुढे म्हणाले, सध्या न्यूनतम वेतन एक हजार रुपये मिळत आहे. त्यात दोन ते तीन हजारांची प्रस्तावित वाढ असून, या आशयाचा प्रस्ताव श्रम मंत्रालयाकडून वित्त मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. २०१४ नंतर प्रथमच ही वाढ होणार आहे. मात्र, निवृत्त वेतनधारक खूश होतील असे वाटत नाही. कारण वाढती महागाई लक्षात घेता हे वाढीव वेतन किमान दोन व्यक्तींच्या आवश्यक गरजा भागवू शकत नाही. भारतीय मजदूर संघाने वन नेशन वन पेन्शनची मागणी केली आहे. ती पूर्ण केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. शिल्पा देशपांडे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचे दायित्व केंद्र आणि राज्य सरकारचे आहे.

ते प्रामाणिकपणे निभावले गेले तर ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या दूर होतील. सभेला भामसंचे विदर्भ प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार, जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे, अशोक भुताड, राधाकृष्णन, व. ना. परिसंघाचे सचिव सुरेश चौधरी, विवेक देशपांडे, विनायक जोशी, नितीन बोरवनकर, अर्चना सोहनी, आदी उपस्थित होते. संचालन रामभाऊ नवघरे, प्रास्ताविक व अहवाल वाचन सुधीर डबीर यांनी केले. आभार राजाभाऊ जगताप यांनी मानले.

Web Title: Retirement pension should be 50% of the last salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.