विखुरलेल्या रिपाइंची मोट बांधण्याचा पुन्हा प्रयत्न

By admin | Published: July 27, 2014 01:15 AM2014-07-27T01:15:43+5:302014-07-27T01:15:43+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध गटामध्ये विभागलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या राजकीय पक्षाची मोट बांधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाला आहे. शनिवारी रिपाइंच्या विविध

Retrying of scattered repairs | विखुरलेल्या रिपाइंची मोट बांधण्याचा पुन्हा प्रयत्न

विखुरलेल्या रिपाइंची मोट बांधण्याचा पुन्हा प्रयत्न

Next

आमदार निवासात बैठक : रिपाइंच्या विविध गटांचे पदाधिकारी सहभागी
नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध गटामध्ये विभागलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या राजकीय पक्षाची मोट बांधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाला आहे. शनिवारी रिपाइंच्या विविध गटातील पदाधिकाऱ्यांची आमदार निवासात यासंबंधात पहिली बैठक पार पडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया सध्या विविध गटांमध्ये विभागल्या गेली आहे. प्रत्येक गटातील नेते त्यांचाच पक्ष खरा असल्याचे सांगत असतात. रिपाइंच्या एकीकरणाचे आजवर अनेक प्रयत्न झाले; परंतु ते जास्त काळ टिकू शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्वार्थी नेतृत्वामुळे रिपाइंचे ऐक्य होत नसल्याचा कांगावा करीत दुसऱ्या फळीतील नेत्यांनी एकत्र यावे, यासाठी १० वर्षांपूर्वी प्रयत्न झाला. रिपब्लिकन आघाडीच्या स्वरूपात तो प्रयत्न यशस्वी ठरला होता. त्यावेळी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आघाडीचे तब्बल ११ नगरसेवक निवडून आले होते. परंतु त्यानंतर आघाडीचीही दोन शकले पडली आणि त्याचेच स्वतंत्र गटात रूपांतर झाले.
लोकसभेच्या निवडणुकीमध्येसुद्धा रिपाइं आघाडीसंदर्भात प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विविध गटात विभागलेल्या रिपब्लिकन पक्षांनी आणि संघटनांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन करावी आणि निवडणुकीला सामोरे जावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. शनिवारी यासंदर्भात रिपब्लिकनांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आमदार निवासात पहिली बैठक पार पडली. या बैठकीत आघाडी स्थापन करण्यावर चर्चा झाली; परंतु अंतिम निर्णय होऊ शकला नाही. शंकर मानके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत रिपाइंचे ज्येष्ठ नेते हरिदास टेंभूर्णे, दिनेश गोडघाटे, धीरज गजभिये, अमृत गजभिये, जी. वासुदेव, विश्वनाथ खांडेकर, एकनाथ ताकसांडे, प्रा. राहुल मून, नीलेश ढोके, प्रकाश कुंभे, हंसराज भांगे, अंबादास गजभिये, प्रा. अजयकुमार कांबळे, पांडुरंग बोरकर, अरुण गेडाम, डॉ. चरणजित जनबंधू, जितू जिथे, भागवत डोंगरे, डी.डी. टेंभूर्णे, अ‍ॅड. मिलिंद खोब्रागडे, भय्यासाहेब शेलारे, आर.आर. वासनिक आदींसह रिपाइं, रिपाइं (खो), रिपाइं एकतावादी, भारिप, बहुजन आधार संघ, अनुसूचित जाती-जमाती परिसंघ आदींचे पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Retrying of scattered repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.