पावसाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांसह शहरवासीयांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:27 PM2019-07-26T23:27:17+5:302019-07-26T23:28:03+5:30

गुरुवारपासून पावसाने पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. त्याचबरोबर शहरातील वातावरणात वाढलेल्या उकाड्यापासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात हवामान खात्याने १०८.४ मि.मी. पावसाची नोंद केली आहे.

The return of the rain brought relief to the farmers and the townspeople | पावसाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांसह शहरवासीयांना दिलासा

पावसाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांसह शहरवासीयांना दिलासा

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात १०८.४ मि.मी. पावसाची नोंद : उकाड्यापासून मिळाली सुटका

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : गुरुवारपासून पावसाने पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. त्याचबरोबर शहरातील वातावरणात वाढलेल्या उकाड्यापासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात हवामान खात्याने १०८.४ मि.मी. पावसाची नोंद केली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार शहरात येते काही दिवस पावसासाठी स्थिती अनुकूल आहे. विदर्भातील काही भागांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या जो पाऊस होत आहे तो पश्चिम बंगाल व आसपासच्या परिसरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आहे. गेल्या २४ तासात नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागात चांगला पाऊस होऊ शकतो. नागपुरात बराच ब्रेक दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी रात्रभर पाऊस सुरू होता. पावसामुळे शहरातील वातावरणात काहिसा गारवा अनुभवता आला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागपूरकरांना काहिसा दिलासा मिळाला.
विशेष म्हणजे शेतकºयांना सर्वाधिक पावसाची प्रतीक्षा होती. जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनच्या पेरण्या आटोपल्या होत्या. पण पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. सर्वाधिक चिंता भात उत्पादक शेतकºयांना होती. जिल्ह्यात भाताच्या रोवण्या खोळंबल्या होत्या. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे भात उत्पादक शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.
 उकाडा झाला कमी
गुरुवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी पहाटे पहाटे थांबला. त्यामुळे शुक्रवारी तापमानात ५.१ अंशाने पारा घसरला. तापमान २ डिग्रीने घसरल्याने उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला. पावसाला ब्रेक लागल्याने तापमानात वाढ झाली होती. उम्मस वाढल्याने नागपूरकरांना गर्मी असह्य झाली होती.
जलसंकट अजूनही कायम
जुलै महिन्यात नागपुरात सर्वाधिक पाऊस होतो. या महिन्यात सरासरी ३९३.५२ मि.मी. पाऊस होतो. जुन आणि जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत ५९८.०२ मि.मी. सरासरी पाऊस होतो. परंतु १ जूनपासून २६ जुलैपर्यंत नागपूर शहरात ३५०.७ मि.मी. पाऊस झाला आहे. पण जून आणि जुलै महिन्याचा बॅकलॉग अजूनही भरलेला नाही. त्यामुळे शहरावर ओढवलेले जलसंकट अजूनही कायम आहे. नागपूर शहरात ऑगस्टमध्ये २३८.४०, सप्टेंबरमध्ये १८६.९० व ऑक्टोबरमध्ये ५१.५० मि.मी. सरासरी पाऊस होतो. पावसाळ्यात सरासरी १०७४.८२ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे. मात्र यावर्षी पाऊस अखंडित होत असल्याने परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे.

Web Title: The return of the rain brought relief to the farmers and the townspeople

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.