परतीच्या पावसाने शेतकरी धास्तावले; नागपूरसह विदर्भ गारठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 10:28 AM2020-02-03T10:28:53+5:302020-02-03T10:29:20+5:30

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने विदर्भातील धानासह अन्य पिकांना जबरदस्त फटका बसला असून शेतकरी हवालदील झाले आहेत.

The return rains terrified the farmers; Vidarbha was overthrown with Nagpur | परतीच्या पावसाने शेतकरी धास्तावले; नागपूरसह विदर्भ गारठला

परतीच्या पावसाने शेतकरी धास्तावले; नागपूरसह विदर्भ गारठला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने विदर्भातील धानासह अन्य पिकांना जबरदस्त फटका बसला असून शेतकरी हवालदील झाले आहेत. सोमवारी पहाटेपासूनच नागपूर शहरात पावसाने हजेरी लावली.
परतीच्या पावसाने धान, सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. एकेकाळी आकाशाकडे पावसासाठी डोळे लावून बसलेला बळीराजा आता हा पाऊस थांबावा म्हणून आकाशाला साकडे घालतो आहे. सोमवारी पहाटेपासूनच नागपुरात पावसाची रिपरिप सुरू आहे. हवेत कमालीचा गारठा व ढगाळ हवामान यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. एकीकडे धानाला अंकूर फुटत आहेत तर दुसरीकडे कापूस भिजून सडतो आहे अशी अवस्था विदर्भातील अनेक गावांमध्ये, शेतांमध्ये दिसून येते आहे.

Web Title: The return rains terrified the farmers; Vidarbha was overthrown with Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस